शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय मच्छीमाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 08:57 IST

अनेक वर्षांपासून पाकिस्तानी तुरुंगात खितपत पडलेल्या भारतीय मच्छिमारांपैकी काही मच्छिमारांची पाकिस्तान सरकारने टप्प्याटप्प्याने सुटका करण्यास सुरुवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : पाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेल्या सोमनाथ (गीर) येथील रहिवासी भूपतभाई जीवा भाई (वय ५२) या मच्छिमाराचा ९ ऑक्टोबरला मृत्यू झाला. गुजरात राज्यातील ट्रॉलरमधून मासेमारी करताना भारताची समुद्र हद्द ओलांडल्याने पाकिस्तान सैनिकांनी त्याला अटक केली होती. भूपतभाई याचा मृतदेह एक महिन्यानंतर मायदेशात पाठविला जाणार आहे.

   अरबी समुद्रात मासेमारी करताना पाकिस्तानी सैनिकांनी अटक केलेल्या आणि अनेक वर्षांपासून पाकिस्तानी तुरुंगात खितपत पडलेल्या भारतीय मच्छिमारांपैकी काही मच्छिमारांची पाकिस्तान सरकारने टप्प्याटप्प्याने सुटका करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अजूनही शेकडो भारतीय मच्छिमार, खलाशी पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडले आहेत. त्यातील काही लोकांच्या शिक्षेचा कालावधीही पूर्ण झाला तरी त्यांना सोडण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. यापूर्वी जगदीश मंगल (वय ३५) या मच्छिमाराचा ६ ऑगस्टला मृत्यू झाला होता. तोही गुजरात राज्यातील होता. त्यांचे पार्थिव ४० दिवसांनी परत आणले गेले. भूपतभाई यांचे पार्थिव लवकरच परत आणले जाईल, असा विश्वास त्यांच्या नातेवाइकांकडून व्यक्त केला जात आहे.

२६४ जण तुरुंगातआजमितीस २६४ भारतीय मच्छिमार पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. २५० हून अधिक भारतीय मच्छिमारांनी त्यांची शिक्षा पूर्ण केली असून, त्यांचे राष्ट्रीयत्वही निश्चित झाले आहे. या मच्छिमारांची तत्काळ सुटका करावी, अशी मागणी इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमॉक्रॅसी संस्थेचे माजी सचिव जतिन देसाई यांनी केली आहे.

पाकिस्तान सरकार २ जुलैला १०० भारतीय मच्छिमारांना सोडणार होते; परंतु, काही अपरिहार्य कारणांमुळे त्यांनी त्यांची सुटका केली नाही.  भारतानेही ७४ पाकिस्तानी मच्छिमारांना ताब्यात घेतले आहे. या मच्छिमारांनी अनावधानाने समुद्रातील सीमा ओलांडून पलीकडच्या देशाच्या सीमेत प्रवेश केल्याचा ठपका ठेवून  त्यांना अटक करू नये. त्याऐवजी, त्यांना त्यांच्या देशाच्या सीमेत परत पाठवावे. - जतीन देसाई, माजी सचिव, इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस ॲण्ड डेमॉक्रॅसी संस्था

टॅग्स :Pakistanपाकिस्तान