शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

सर्पदंशामुळे जिल्ह्यातील मृत्यूचे वाढले प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:10 IST

दहा महिन्यात नऊ जण दगावले

हितेंन नाईक/अनिरुद्ध पाटीललोकमत न्यूज नेटवर्कपालघर/बोर्डी : पालघर जिल्ह्यात मागील दहा महिन्यात सर्पदंशाने नऊ जण दगावले आहेत, तर एकाला विंचूदंशाने प्राण गमवावा लागला आहे. गत तीन वर्षांत सर्पदंशाने सतरा जणांचा आणि तिघांचा विंचूदंशाने मृत्यू झाल्याची नोंद पालघर जिल्ह्यातील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयातील आहे. पालघर जिल्ह्यातील सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अधिवासाची ठिकाणे विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या नानाविध प्रकल्पांच्या कामामुळे उद्ध्वस्त होत असून, नवीन वास्तव्याच्या शोधार्थ साप, विंचू आदी विषारी सरपटणारे प्राणी मानवी वस्तीच्या जवळ येत आहेत. तसेच हवेतली उष्णताही वाढत चालली असून, त्यापासून बचाव करण्यासाठी नेहमी रात्री बाहेर पडणाऱ्या प्राण्यांच्या हालचाली आता दिवसाढवळ्याही वाढू लागल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीणबहुल भागात सर्पदंश, विंचूदंशाचे प्रमाण मोठे असल्याचे दिसून आले आहे. शेतामध्ये, घराच्या आडोशाला, रस्त्यात चालताना अंधारात पाय पडल्याने हे दंश होत आहेत. सर्पदंशामुळे गेल्या तीन वर्षांत उपचारादरम्यान हे १७ जण दगावले आहेत. या प्रकारे मृत्यू होऊनही नोंदी न झाल्यामुळे ही आकडेवारी आणखी वाढू शकते. पालघर जिल्ह्यात गेल्या वर्षी सर्वाधिक सर्पदंशाने चार मृत्यू हे डहाणू तालुक्यातील कासा रुग्णालयात झालेले आहेत. तर जव्हार रुग्णालयात तीन आणि मनोर रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत प्रत्येकी चार मृत्यू झाले असले तरी त्या तुलनेत या वर्षी मृत्यू झाल्याचा आकडा वाढला आहे. एप्रिल ते जानेवारीपर्यंत नऊ जण दगावले आहेत.

सर्प-विंचूदंश झाल्यानंतर दंश झालेल्या व्यक्तीला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले जाते. तिथे प्राथमिक उपचार किंवा दंशाची लस देऊन पुढे उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात येते. बहुतांश वेळेला सर्पदंश झाल्यानंतर प्राथमिक उपचाराचे सखोल ज्ञान अथवा योग्य औषधोपचार मिळण्यास उशीर होत असल्याने त्या व्यक्तीवर उपचार करणे शक्य होत नाही. परिणामी, उपचारांमध्ये गुंतागुंत निर्माण होत असल्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागतो.

गतवर्षी दोन हजारांहून अधिक नागरिकांना सर्पदंश गेल्या वर्षी दोन हजारांहून अधिक जणांना सर्पदंश झाले होते. २०१९-२० साली तीन हजारांच्या जवळपास तर २०१८-१९ साली तीन हजारांहून अधिक जणांना सर्पदंश झाले होते. या वर्षी २२३ जणांना विंचूदंश, गेल्या वर्षी ४५२ जणांना व १८-१९ मध्ये ३९३ जणांना विंचूदंश झाले आहेत. त्यामुळे या मृत्यूच्या घटनांमध्ये कमतरता आणण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखताना अशा रुग्णांना वेळीच उपचार मिळतील, अशी व्यवस्था उभारणे गरजेचे बनले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारsnakeसाप