शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडमध्ये नऊ तासांचे असह्य भारनियमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 23:46 IST

शहरात वीज वितरणात फारच गोंधळ आहे़ ग्राहकांच्या तक्रारीकडे लक्ष देण्याऐवजी व सेवेत सुधारणा करण्याऐवजी येथे अन्यायकारक भारनियमन केले जाते आहे़.

विक्रमगड : या तालुक्यात व शहरात वीज वितरणात फारच गोंधळ आहे़ ग्राहकांच्या तक्रारीकडे लक्ष देण्याऐवजी व सेवेत सुधारणा करण्याऐवजी येथे अन्यायकारक भारनियमन केले जाते आहे़. सद्यस्थितीत या तालुक्यात तीनवेळेस नऊ तासांचे भारनियन चालू आहे़ त्यामुळे येथील व्यवसाय ठप्प होत असून या भारनियमनाला कंटाळून अनेक व्यापारी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत होण्याच्या मार्गावर आहेत़ तर शेती व्यवसायालाही यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अगोदरच कमी विजेच्या दाबामुळे अनेक इलेट्रीक यंत्रे निट चालत नाही व नऊ तासांचे भारनियम असल्याने सर्वच व्यवहार ठप्प होत आहे़ त्यामुळे येथील जनता या महावितरणाच्या भारनियमनाला कंटाळलेली असून नाराजी व्यक्त करीत आहे़भाजप सरकारने निवडणूकीत संपूर्ण महाराष्टÑ भारनियमन मुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले? असा सवाल वीज ग्राहक विचारीत आहेत़ या भारनियमनामुळे व्यापारी वर्गाला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत असून अनेक व्यापार, उद्योगधंदे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. हातावर गुजराण करणा-यांवर तर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे़ तर सध्या परिक्षा सुरू असल्याने खेडयापाड्यातील मुलांना अभ्यास करतांना दिव्याचा आसरा घ्यावा लागत आहे. तर दिवाळीही अंधारात जाणार की काय? असा सवाल केला जातो आहे़विक्रमगड तालुक्यातील भारनियमानाचे वेळापत्रक बनवितांना स्थानिक व्यापारी वर्ग, वीज ग्राहक यांची सोय लक्षात घ्यायला हवी होती. ते न केल्याने येथील शेतकरी, बागायतदार व व्यापारीवर्गाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे़ संध्याकाळी महावितरणने तीन तासांचे भारनियमन केले आहे़ त्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरून कुणाला कोणतेही काम करता येत नाही. रस्त्यावरून वावणेही मुश्किल होऊन गेले आहे.>या तालुक्यातील एकही लोकप्रतिनिधी या समस्येकडे गांभीर्याने पाहत नाही त्यामुळे आमच्या नशिबी हा अन्याय कायमचा पूजला गेला आहे़ महावितरणने भारनियमनाचे तास कमी करावे. अगर पूर्वीप्रमाणेच दोनवेळेचे भारनियमन लागू करावे़ ९ तासांचे भारनियमन तातडीने बंद करावे, अन्यथा या गावातील व्यापार, उद्योग ठप्प होईल.- जयवंत मोतीभाई पटेल, व्यापारी, विक्रमगड