शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

राखीव भूखंडांवर फाेफावली बेकायदा बांधकामे, वसई-विरार महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 03:07 IST

Vasai-Virar News : महापालिका प्रशासनाकडून या बांधकामांवर वेळीच कारवार्इ हाेत नसल्यामुळे भूमाफियांच्या भुलथापांना भुलून येथे सर्वसामान्य नागरिक आयुष्यभराची पुंजी खर्च करून घर खरेदी करत आहेत. मात्र, या घरात राहायला आल्यानंतर त्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.

नालासोपारा : वसई-विरार शहर महापालिकेच्या हद्दीतील राखीव भूखंडांवर माेठ्या प्रमाणात बेकायदा इमारतींचे इमले उभे राहत आहेत. महापालिका प्रशासनाकडून या बांधकामांवर वेळीच कारवार्इ हाेत नसल्यामुळे भूमाफियांच्या भुलथापांना भुलून येथे सर्वसामान्य नागरिक आयुष्यभराची पुंजी खर्च करून घर खरेदी करत आहेत. मात्र, या घरात राहायला आल्यानंतर त्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.वसई विभागामध्ये ५०.६९ टक्के, नालासोपारामध्ये ७७.३७ टक्के, तर विरार विभागात ३०.४५ टक्के राखीव भूखंडांवर बेकायदा इमारती किंवा कब्जा केलेला आहे. शाळा, खेळण्याचे मैदान, गार्डन, पोलीस ठाणे, डम्पिंग ग्राउंड, बफर झोन यासाठी हे भूखंड आरक्षित आहेत. वसई-विरार महापालिकेच्या ९ प्रभागांतील राखीव ठेवलेल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकाम झाल्याचे माहिती अधिकारातून पुढे आले आहे.काही बांधकामे नाल्यावर किंवा नाले बुजवून केलेली आहेत. मनपाच्या सर्व प्रभागांतील हद्दीतील १०४ मार्केट झोनही बांधकामांतून वाचले नाहीत. पालिका बेकायदा बांधकामावर कारवार्इ सुरू असल्याचे सांगत आहे. मात्र राेजच नवी बांधकामे उभी राहत आहेत. याबाबतीत अनधिकृत बांधकाम विभागाशी संपर्क केला असता त्यांनी बाेलण्यास टाळाटाळ केले. तत्कालीन अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे आरक्षित भूखंडावर ही बांधकामे उभी राहिल्याचे त्यांनी ‘लाेकमत’ला नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

मनपाने राखीव भूखंडावर उभ्या राहणाऱ्या बांधकामांवर वेळीच कारवार्इ झाली असती तर खेळण्यासाठी मैदाने, शाळा, हॉस्पिटल, मार्केट यांचे भूखंड शिल्लक राहिले असते. तसेच घर खरेदी करणाऱ्यांची फसवणूकही टळली असती.- नरेंद्र बाईत, माहिती अधिकार कार्यकर्ते

बेकायदा बांधकामे ताेडण्याचे अनधिकृत बांधकाम विभागाचे आहे. महापालिकेने येथील घरांना घरपट्टी आणि पाण्याचे कनेक्शन देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. टप्प्याटप्प्याने या बांधकामांना महापालिका सुविधा पुरवत आहे.- राजेंद्र लाड,     कार्यकारी अभियंता,     वसई-विरार महापालिका

टॅग्स :Vasai Virarवसई विरार