शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘तुम्ही येथून गेला नाहीत, तर गोळ्या घालू!’; पोलिसांचा खलाशांना दम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 06:16 IST

स्थानिकांकडून दगडफेक, पोलिसांनी कापले ट्रॉलर्सचे दोरखंड

हितेन नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : गुजरातमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील सुमारे ५५० खलाशी कामगारांना कुणी वालीच उरलेला नाही. रात्रीच्या अंधारात गुजरातच्या स्थानिकांकडून ट्रॉलर्सवर अमानुषपणे दगडफेक केली गेली, तर त्या ट्रॉलर्सचे दोरखंड पोलिसांनी कापून त्यांना पुन्हा भुकेलेल्या अवस्थेत माघारी वेरावल बंदरात हाकलून लावले. ‘तुम्ही येथून गेला नाही, तर गोळ्या घालू’ असा दमही पोलिसांनी भरल्याचे एका कामगाराने सांगितले.पोरबंदर, ओखा, वेरावल आदी गुजरातच्या विविध बंदरांतून ७ महिन्याच्या कालावधीनंतर आपल्या घरी परतण्यासाठी सुमारे १ हजार ८०० खलाशी उंबरगाव येथे आल्यानंतर रविवारी फक्त गुजरात, दमण व सेलवासा येथील खलाशांना ट्रॉलर्सवरून उतरविण्यात आले. त्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी करून घरी पाठवण्यात आले. परंतु महाराष्ट्रातील खलाशांना उतरवण्यास गुजरात सरकार व पोलिसांनी नकार देत त्यांना जबरदस्तीने ट्रॉलर्सवर रोखले. ‘लोकमत’ने पालकमंत्री दादासाहेब भुसे यांना मोबाईल, स्वीय सचिव, मेसेजद्वारे अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. खासदार राजेंद्र गावित, आमदार हितेंद्र ठाकूर, आ. रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉ.क्कैलास शिंदे आदींशी संपर्क साधून जिल्ह्यातील ५५० खलाशांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याबाबत वारंवार कळवूनही स्थानिक कामगारांना आणण्यासाठी सर्वांना अपयश आले. मोठ्या आशेने हे कामगार लोकप्रतिनिधी व प्रशासन आपल्यासाठी काहीतरी करतील अशी वाट पाहत होते. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांना दिलासा देणारा निर्णय न आल्याने त्यांचे मनोधैर्य खचले होते. यादरम्यान २-३ कामगारांना फिटही आल्याने बेशुद्धावस्थेतील कामगारांना योग्य उपचारही गुजरातच्या आरोग्य विभागाकडून न मिळाल्याने कांदा फोडून त्यांच्या नाकाला लावून त्यांना शुद्धीवर आणण्यात आल्याची माहिती एका कामगाराने आपल्या मोबाईलवरून स्थानिकांना दिली.पालकमंत्री ‘नॉट रिचेबल’पालघर जिल्ह्याला उशिराने भेट देणाऱ्या कृषिमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या लेटलतीफ कारभाराचा फटका या कामगारांनाही बसला. त्यांना रविवारी कॉल करून मेसेज टाकून त्यांच्या सचिवांशी बोलून परिस्थितीचे गांभीर्य समजावूनही त्यांनी व्यवस्थेविषयी सकारात्मक निर्णय घेतला नाही. सोमवारी वसई येथे पालक मंत्र्यांशी मोबाइलवरून या परिस्थितीबाबत बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या सचिवांनी हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही.आज अन्य राज्यातून पालघर जिल्ह्यात रोजगारासाठी आलेल्या १५ ते २० हजार कामगारांच्या राहण्याचा, आरोग्य तपासणीचा, जेवणाचा खर्च मागील अनेक दिवसांपासून राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन उचलीत असताना ७ महिन्यांपासून कुटुंबापासून लांब असलेल्या आणि आपल्या घरापासून १० ते १२ किमी अंतरावर थांबलेल्या ५५० स्थानिक कामगारांसाठी पालकमंत्री काहीही उपाययोजना आखू न शकल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Gujaratगुजरात