शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

वाढवण लढ्यात मी तुमच्यासोबत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेेंची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 23:46 IST

आंदोलनाला शिवसेनेची ताकद

पालघर : वाढवण बंदराला स्थानिकांचा एकमुखाने विरोध असल्याने शिवसेना त्यांच्यासोबत कालही होती, आजही आहे आणि उद्याही स्थानिकांच्या सोबतच राहील, असे वचन शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीसोबत झालेल्या चर्चेदरम्यान शुक्रवारी दिले. मी काल शिवसेना पक्षप्रमुख म्हणून बोलत होतो. आज मुख्यमंत्री म्हणून जबाबदारीने बोलत असल्याचे त्यांनी सांगिल्याने या आंदोलनाला आता सेनेची ताकद मिळणार आहे.यंदा विधानसभा निवडणुकीनंतर अचानक युतीमध्ये बेबनाव निर्माण झाल्याने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची सत्ता प्रस्थापित झाली. त्यामुळे वाढवणवासीयांचे मनोधैर्य उंचावले होते. बंदरविरोधी संघर्ष समितीने मुख्यमंत्र्यांची भेट व्हावी म्हणून खासदार गावित, मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न करूनही भेट मिळत नसल्याने ‘लोकमत’ने २४ फेब्रुवारीच्या अंकात भेट मिळत नसल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. त्याचे पडसाद किनारपट्टीवर उमटल्याने स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांना जाब विचारला जाऊ लागला होता. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री सुभाष देसाई, खासदार राजेंद्र गावित, पालकमंत्री दादा भुसे, संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, आ.श्रीनिवास वणगा यांच्या प्रयत्नाने आज अखेर बंदर संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील, अशोक आंभिरे, वैभव वझे, एनएफएफचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृती समिती अध्यक्ष लिओ कोलासो, महिला जिल्हाध्यक्ष ज्योती मेहेर, राजन मेहेर, रामकृष्ण तांडेल यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत भेट घडवून आणली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी समितीसोबत ४५ मिनिटे चर्चा केली आणि मी तुमच्यासोबत असल्याचे सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना