विरार: घरगुती भांडणाचा राग मनात ठेऊन आपल्या नवऱ्याचा पाय दगडी खलबत्ता आणि लाकडी बॅटने तोडल्याची खळबळजनक घटना वसईत घडली आहे. याप्रकरणी नवऱ्याच्या तक्रारीवरुन माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रीमा देवडीया (३६) असे पत्नीचे नाव असून जखमी झालेला नवरा सुधाकर देवडीया (४१) सध्या हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहे. तीन दिवसांपूर्वीची घटना आहे. कार्तिक (४) या आपल्या मुलासोबत सुधाकर आपल्या बेडरुममध्ये झोपले होते. पहाटे अडीचच्या सुमारास पायातून प्रचंड वेदना होत असल्याने सुधाकर झोपेतून जागे झाले. समोरचे दृश्य पाहून सुधाकर हादरून गेले. रीमा दगडाच्या खलबत्त्याने सुधाकर यांच्या उजव्या पायावर प्रहार करीत होती. प्रचंड वेदना होत असलेले सुधाकर ओरडत होते. हा प्रकार घडल्यानंतर सुधाकर थेट हॉस्पीटलमध्ये गेले. दोन दिवसांनी त्यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. (वार्ताह)
नवऱ्याचा पाय तोडला
By admin | Updated: March 23, 2017 01:14 IST