शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा वियोग सहन होईना; तिच्या मृत्यूनंतर अवघ्या पाच तासांत वृद्धाने सोडला प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 11:38 IST

वसईतील रानगाव मर्सिस येथे एकाच दिवशी वृद्ध पती-पत्नीचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन

- आशिष राणेलोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसईच्या पश्चिम भागातील रानगाव मर्सिस सांगोडेवाडी येथील वेरोनिका जॉन डायस (72 ) यांचा नुकताच हृदयविकाराच्या तीव्र धक्याने मृत्यू झाला. मात्र, त्या घटनेपाठोपाठ अवघ्या पाच तासांच्या अंतराने त्यांचे पती जॉन अंतोनी डायस (75 ) यांनाही पत्नी वियोगाचा तीव्र धक्का सहन न झाल्याने त्यांचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. डायस कुटुंबावर अचानक कोसळलेल्या या संकटामुळे अवघ्या मर्सिस गावावर शोककळा पसरली आहे. 

बृहन्मुंबई महापालिका शाळेतून 28 वर्ष  शिक्षिका म्हणून सेवानिवृत्त झालेल्या वेरॉनिका गेली अडीच वर्षे पॅरेलेसिसच्या आजाराने अंथरुणास खिळलेले पती जॉन अंतोनी डायस यांच्यावर उपचार व सेवा करत होत्या. दरम्यान 25 एप्रिल, रविवारी दुपारी 1.30 वाजता वेरॉनिका यांना अचानक  हृदयविकाराचा झटका आला, त्यात त्यांचे निधन झाले. 

डायस यांची मुलं रॉजर व नेव्हील, विवाहित मुली स्विडल आणि प्रिंसिया, तथा जावई आणि मोजके नातलग यांनी एकत्रित येत रविवारी सायं. 6 वाजता मर्सिस चर्च येथे वेरॉनिका यांच्यावर अंत्यसंस्कार करून घरी परतले. आदरांजलीची घरातच प्रार्थना सुरु असतानाच बाजूच्या रूममध्ये असलेले जॉन डायस यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांनीही पत्नी पाठोपाठ जगाचा निरोप घेतला. त्यामुळे पुन्हा कुटुंबातील सदस्यांनी रात्री 8.30 वाजता जॉन यांच्यावर अंत्यसंस्कार केले. 

जॉन हे आर्मीतील निवृत्त सैनिक असून, गोरखपूर रेजिमेंटमध्ये त्यांनी 15 वर्षे देशसेवा केली होती. त्यानंतर काही वर्षे मुंबई आयकर विभागात ते कार्यरत होते. नंतर त्यांनी वसईत सिमेंट एजन्सी आणि बांधकामाचा स्वतःचा व्यवसाय सुरु केला होता. मात्र गेले अडीच वर्ष ते पॅरेलेसिसच्या आजाराचा सामना करीत होते. डायस दांपत्याच्या अश्या एकाच दिवशीच्या  जाण्याने मर्सिस आणि वसई विरार मध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार