शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपी पतीला १५ वर्षांनंतर अटक, उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथे पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:20 IST

पत्नी रिहाना रात्री गाढ झोपलेली असताना आरोपी पती जवादने तिच्या डोक्यात मोठा दगड घालून जीवे ठार मारले होते. महंमद याच्या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी २५ मे २०११ रोजी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून आरोपी पती फरार होता...

मंगेश कराळे -

नालासोपारा : पत्नीची निर्घृण हत्या करून पसार झालेल्या आरोपी पतीला तब्बल १५ वर्षाने उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथून मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी आणि सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी सोमवारी दिली आहे. 

संतोष भवनच्या बावशेत पाडा येथील तुळशी नगरमधील द्वारका चाळीत, रिहाना (३५) ही दुसरा नवरा जवाद सय्यदसह पहिल्या नवऱ्यापासून झालेला मुलगा व दोन मुलींसह राहत होती. मुलगा महंमद खान हा गाळा नगरच्या जरीच्या कारखान्यात काम करत तिथेच मित्रांसह राहत होता. तो अधूनमधून दोन्ही बहिणी व आईला भेटण्यासाठी घरी यायचा. याच कारणावरून सावत्र वडील जवादला राग यायचा व त्यामुळे रिहाना सोबत भांडणे व्हायची. २२ मे २०११ रोजी महंमदने आई व बहिणीसोबत घरी मुक्काम केला होता. याच कारणावरून २४ मेच्या रात्री पती पत्नीमध्ये जोरदार वाद झाले. पत्नी रिहाना रात्री गाढ झोपलेली असताना आरोपी पती जवादने तिच्या डोक्यात मोठा दगड घालून जीवे ठार मारले होते. महंमद याच्या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी २५ मे २०११ रोजी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून आरोपी पती फरार होता.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर व संवेदनशील गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्याचे आदेश केले होते. हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरुपाचा असल्याने फरार आरोपीचा यापूर्वी सर्वोतोपरी शोध घेऊन देखील तो गेल्या १५ वर्षापासुन मिळुन येत नव्हते. त्याअनुषंगाने मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांनी सपोनि दत्तात्रय सरक, सफौज आसिफ मुल्ला, पोहवा. संग्राम गायकवाड, महेश वेल्हे, शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, हनुमंत सूर्यवंशी असे तपास पथक तयार केले होते.

या पथकाने गुन्ह्याची माहिती घेऊन गेल्या १ महिन्यांपासून सतत अहोरात्र मेहनत घेवून तपासात सातत्य ठेवून आरोपीची माहीती घेतली. आरोपी हा त्याचे मूळ गावी असल्याचे कळले. या पोलीस पथकाने आरोपीच्या मुळ गावी जावुन बातमीदार व आरोपीचे मोबाईल फोनचे तांत्रीक विश्लेषणावरून तो त्याचे गांवातील घरात राहत असल्याची माहिती मिळाली. लखनऊच्या स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने सापळा लावुन आरोपी जवाद सय्यद (३१) याला २५ जानेवारीला शिताफिने ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीला लखनऊच्या न्यायालयात हजर करून २८ जानेवारीपर्यंत ट्रान्झिट रिमांड घेतली आहे.

सदरची कारवाई पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे व सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पो.निरी. अविराज कुराडे, सपोनिरी. दत्तात्रय सरक, नितीन बेंद्रे, सहापोउपनिरी. श्रीमंत जेधे, मनोहर तावरे, आसीफ मुल्ला, पोहवा. शिवाजी पाटील, महेश वेल्हे, हनुमंत सुर्यवंशी, राजाराम काळे, संतोष मदने, संग्रामसिंग गायकवाड, प्रविणराज पवार, गोविंद केंद्रे, साकेत माघाडे, नितीन राठोड, अंगद मुळे, आकील सुतार, मसुब सचिन चौधरी, सफौ. संतोष चव्हाण यांनी केली आहे.