शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शेतमजुरांचे दर वाढल्याने शेती करायची कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 01:43 IST

यंत्राने होणारी कामे भातशेतीची नांगरणी, चिखलणी केल्याने शेतजमीन योग्य प्रमाणात भुसभुशीत होते. त्यामुळे शेतकऱ्यांची अंगमेहनत, वेळ व पैशाची बचत होते.

वसंत भोईर लोकमत न्यूज नेटवर्कवाडा :  वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. येथील ‘वाडा कोलम’ हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. मात्र, निसर्गाचा लहरीपणा व भातशेतीसाठी लागणाऱ्या मजुरांची कमतरता, कामाचे वाढलेले दर, यामुळे बदलत्या काळानुसार येथील शेतकरी ट्रॅक्टर, पाॅवर टिलर यांसारख्या आधुनिक यंत्रांचा आधार घेऊन पारंपरिक पद्धतीच्या शेतीला छेद देत ‘हायटेक’ बनू पाहत आहेत, तरीही येथील शेतकऱ्यांना मजुरांची गरज भासत असल्याने शेतमजुरांचा प्रश्न बिकट बनला आहे.शेती व्यवसायाला पूर्वी वेगळीच धार होती. येथील शेतकरी आपल्याकडील लाकडी नांगर आणि बैलजोड्या, तसेच अन्य अवजारे एकमेकांच्या शेतात नेऊन शेती करत, परंतु काळ बदलला तसे पारंपरिक शेती व्यवसायात यांत्रिक अवजारांचा वापर सुरू झाला आहे. बैलजोडीच्या जागी शेतकरी ट्रॅक्टर, पाॅवर टिलरचा आधार घेत आहेत. दुसरीकडे पूर्वी शेतकरी एकमेकांच्या शेतात जाऊन स्वतः राबत असत. त्याच्याऐवजी आता शेतीत मजूर दिसू लागले आहेत. मात्र, शेतमजुरांचे दर गगनाला भिडले आहेत.

शेतकरी म्हणतात की... 

शासनाच्या कृषी विभागाकडून ५० टक्के अनुदानावर ट्रॅक्टर, पाॅवर टिलर राज्यातील शेतकऱ्यांना मिळत आहे, शिवाय महिला बचत गटांसाठी विशेष सवलत असल्याने शेतकरी यांत्रिक अवजारांचा वापर करू लागले आहेत. - किशोर पाटील,शेतकरी, देवघर

  बैलजोडीच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांना त्या खरेदीच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत, तसेच माळराने शिल्लक राहिली नाहीत, तसेच बैलांना चारण्यासाठी गुराखी मिळत नाहीत. त्यामुळे आता शेतकरी यंत्राचा आधार घेऊ लागला आहे.- शांताराम पाटील, शेतकरी, डाकिवली

कृषी यंत्रांनी घेतली मजुरांची जागापूर्वी शेतकऱ्यांना मजुरांवर अवलंबून राहावे लागत असे. मात्र, आता कृषिकामांसाठी अनेक यंत्रे उपलब्ध झालेली असून, मजुरांच्या कामाच्या तुलनेत पाॅवर टिलर आणि ट्रॅक्टरमुळे कामे झपाट्याने होत असल्याने, शेतकऱ्यांची अंगमेहनत, पैसा आणि वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होऊ लागली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीVasai Virarवसई विरार