शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

'मी विजबिल भरणार नाही, तुम्हीही भरू नका', हितेंद्र ठाकुरांचे वसईकरांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 23:13 IST

चक्क लॉकडाऊन काळात हितेंद्र ठाकूर यांना पाच बिले मिळून तब्बल  5 लाख 50 हजारांचे विजबिल महावितरणने पाठवल्याने त्यांनी महावितरण व राज्य सरकारवर टीका करत प्रचंड रोष व्यक्त केला आहे.

वसई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात विरारस्थित शाळा, कॉलेज बंद असताना देखील माझ्या  निवासस्थानासह अवास्तव आलेली साडेपाच लाखांची विजबिले मी अजिबात भरणार नाही, किंबहुना जी विजबिलं योग्य आहेत. ती त्यांनी जरूर भरावी. मात्र अवास्तव बिले तुम्हीही भरू नका, असे जाहीर आवाहनच आता वसईचे आमदार हितेंद्र ठाकुर यांनी वसईतील जनतेला केले आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विरारस्थित विवा कॉलेज, शाळा व घराचे विजबिल भरमसाठ आले असून त्यांना पाच बिलं मिळून  चक्क 5 लाख 50 हजारांचे विजबिल आले असल्याची माहिती स्वतः आम हितेंद्र ठाकूर यांनी शनिवारी विरार येथे लोकमतशी बोलताना दिली.

राज्यभरात विजबिलाच्या असंख्य तक्रारींचा महापूर सुरू असताना सततच्या तक्रारींनी राज्य सरकारचीही डोकेदुखी कमालीची वाढली आहे. यात सर्वसामान्यांपासून राजकीय नेते, व्यवसायिक असतील तर यात सेलिब्रिटीं देखील असून अशा अनेकांनी जाहीररित्या वाढीव व अवास्तव विजबिलाबाबत प्रंचड रोष व्यक्त केला आहे. यामध्ये आता हितेंद्र ठाकूर यांचाही समावेश झाला आहे. चक्क लॉकडाऊन काळात हितेंद्र ठाकूर यांना पाच बिले मिळून तब्बल  5 लाख 50 हजारांचे विजबिल महावितरणने पाठवल्याने त्यांनी महावितरण व राज्य सरकारवर टीका करत प्रचंड रोष व्यक्त केला आहे. सर्वसामान्य नागरिक हैराण असून महावितरण नागरिकांना अवास्तव विजबिलं पाठवत असून अशी अवास्तव विजबिलं नागरिकांनी अजिबात भरू नये मी तुमच्या सोबत आहे. मात्र विजबिलं योग्य असतील तर जरूर भरा,असे आवाहन आता या निमित्ताने हितेंद्र ठाकूर यांनी वसईकरांना केले आहे

कोरोना संकटात आधीच जनता हैराण आहे. त्यामुळे नागरिकांना वेठीस धरु नये. कंपनी, उद्योगधंदे बंद आहेत. नोकऱ्या नाहीत, कुठं पगार नाहीत तर बहुतांश वेतन कपात देखील सुरू आहे. त्यातच लॉकडाऊनमध्ये सर्व काही बंद असून विजबिले अवास्तव कशी येऊ शकतात तर मुंबईत अदानी व अंबानी यांच्या युनिटच्या दरापेक्षा आपल्या शासनाचे वीजदर अधिक आहेत तर लॉकडाऊन सरकारने केला त्याची चूक हकनाक नागरिकांना का?  तर यावर तोडगा काढा जनतेला दिलासा द्या, असे हितेंद्र ठाकूर यांनी राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार