शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

अहो, कुणी घर देता का घर?

By admin | Updated: February 6, 2017 04:18 IST

नटसम्राट या चित्रपटात घरासाठी कुणी घर देता का घर? असा आर्त टाहो चित्रपटाचा नायक फोडत असतो. तसाच टाहो वाड्यातील आदिवासी बांधव प्रशासन व सरकारला उद्देशून फोडत आहेत

वाडा : नटसम्राट या चित्रपटात घरासाठी कुणी घर देता का घर? असा आर्त टाहो चित्रपटाचा नायक फोडत असतो. तसाच टाहो वाड्यातील आदिवासी बांधव प्रशासन व सरकारला उद्देशून फोडत आहेत. तुटपुंज्या उत्पन्नात संसाराचा राहाटगाडा हाकलून शिल्लक काहीच उरत नाही. त्यामुळे आयुष्य कच्च्या, कुडांच्या व मोडकळीस आलेल्या घरात जात आहे. सरकारने विविध आवास योजना आखल्या तरी या आदिवासींना घर काही मिळत नाही. ते मिळणार कधी? असा सवाल करणारे निवेदन आदिवासी मुक्ती मोर्चाच्या वाडा शहर अध्यक्षा निशा वायडा यांनी गटविकास अधिकाऱ्यांना व ग्रामपंचायतीला दिले आहे. आदिवासींना घरकुल मिळावे यासाठी ही संघटना सरकार दरबारी हेलपाटे मारत आहे . वाडा ग्रामपंचायत हद्दीत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २०११ च्या सर्वेक्षणाच्या यादीतील ज्या लाभार्थीची घरे अंत्यत मोडकळीस आलेली आहेत. त्यांना प्राधान्याने घरकुल देण्यात यावे यासाठी ग्रामपंचायत मार्फत एक समिती स्थापन करून तिने पाहणी करून पात्र लाभार्थ्यांना घरकुलांचा त्वरीत लाभ द्यावा अन्यथा आदिवासी मुक्ती मोर्चाच्यावतीने उपोषणाचा मार्ग अवलंबिला जाईल, असा इशारा निवेदनात दिला आहे. घरकुल वंचितांमध्ये भाऊ पवार, राजेंद्र घरत, सुनिता सिंगासने, सीता शिंदे, बबन कामडी, सुनिल सवरा, यमुना पागी, यमुना कोकाटे, सुवर्णा कोकाटे, मंगेश शिंदे, शंकर दांडेकर, गुुलाब राथड आदी एकूण १५० जणांचा समावेश आहे.