शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

तारापूरमध्ये धोकादायक स्थितीत अवजड वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 00:37 IST

काही वाहतूकदारांचे सुरक्षिततेकडे दुर्लक्ष : मोटार वाहन कायदे बसवले जातात धाब्यावर

पंकज राऊतलोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : तारापूर एमआयडीसीमधील स्टील कारखान्यांमध्ये प्रतिदिन हजारो टन लोखंड व स्टील क्वाईलसह विविध प्रकारच्या प्रचंड अवजड मालाची वाहतूक करताना  काही वाहतूकदार सुरक्षिततेकडे गंभीरपणे लक्ष न देता वाहतुकीचे व मोटार वाहन कायदे पायदळी तुडवीत असल्याने जीवघेण्या अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याकडे पालघर (वसई) विभागाचे उपप्रादेशिक परिवहन  कार्यालय व बोईसरचे वाहतूक पोलीस फारसे गंभीरपणे लक्ष देत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

तारापूर एमआयडीसीतील अनेक स्टील कारखान्यांबरोबरच बोईसर पूर्वेकडील  बोईसर-चिल्हार फाटा रस्त्यावरील मान व वारांगडेसह एमआयडीसीमध्ये विराज स्टील या उद्योग समूहाचे  विविध प्रकारचे स्टील उत्पादन करणारे अनेक कारखाने असून तेथे मोठ्या प्रमाणात लोखंडी भंगार बाहेरून आणून ते भट्टीत वितळवून त्यापासून लोखंडी ब्लेड  तयार केले जातात. नंतर त्यापासून वायर व इतर अनेक उत्पादने तयार केली जातात. एका कारखान्यातून दुसऱ्या कारखान्यात  तसेच बाहेरून लोखंडी अवजड मालाची अहोरात्र ने-आण करताना  सुरक्षिततेच्या दृष्टीने  साइड सपोर्टबरोबरच अवजड माल लोखंडी साखळीने बांधणे गरजेचे आहे, परंतु ते अवजड लोखंडाचे ब्लेड मोकळेच एकावर एक ठेवून  वाहतूक होत असल्याने ते वळणावर  घसरून  खाली  पडल्यास  पादचारी किंवा वाहनचालकांना धोका उद्भवू शकतो. अनेक  ट्रेलरमध्ये  प्रचंड   ओव्हरलोड लोखंड असते. मात्र सुरक्षिततेचे सर्व कायदे धाब्यावर बसवून जी अवजड मालवाहतूक केली जाते, त्यामुळे काही वेळा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याच्या  दाट शक्यतेबरोबरच रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन वाहतूक होत असल्याने रस्त्यावर खड्डे पडून रस्त्यांचीही दुर्दशा होत आहे. 

तारापूर एमआयडीसीमध्ये पासिंग क्षमतेपेक्षा जास्त अवजड माल धोकादायक पद्धतीने व सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून वाहतूक करणाऱ्या तसेच  ओव्हर साईज वाहनांची विशेष तपासणी मोहीम लवकरच राबविण्यात येऊन मोटार वाहन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल.- दशरथ वाघुळे, उपप्रादेशिक परिवहन  अधिकारी, पालघर (वसई) विभाग

सार्वजनिक ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त धोकादायक अवजड मालवाहतुकीवर  कारवाई नेहमी सुरूच असते व ती पुढेही सुरूच राहील.- प्रदीप कसबे, पोलीस निरीक्षक, बोईसर पोलीस ठाणे