शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार मुसंडी, जि.प.च्या सहापैकी चार जागांवर विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 00:41 IST

वाडा तालुक्यात जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत सहा जागांपैकी चार जागांवर विजय मिळवला आहे.

वसंत भोईर वाडा : वाडा तालुक्यात जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत सहा जागांपैकी चार जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेला दोन जागांवर समाधान मानावे लागले असून या निवडणुकीत मात्र भाजपाचा सुपडासाफ झाला आहे. तर पंचायत समितीत राष्ट्रवादी चार, शिवसेना चार, भाजप दोन तर मनसे आणि अपक्षांनी प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.कुडूस जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे राजेश मुकणे हे २, १७४ मताधिक्क्याने विजयी झाले. आबिटघर गटातून राष्ट्रवादीचे नरेश आकरे विजयी झाले असून त्यांनी सेनेच्या शरद पाटील यांचा पराभव केला तर महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती धनश्री चौधरी यांना तिसऱ्या क्र मांकावर समाधान मानावे लागले. पालसई गटातून राष्ट्रवादीचे शशिकांत पाटील विजयी झाले. त्यांनी भाजपच्या मंगेश पाटील यांचा पराभव केला. मांडा गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अक्षता चौधरी तर गारगाव गटातून राष्ट्रवादीच्याच रोहिणी शेलार विजयी झाल्या असून मोज गटातून शिवसेनेच्या अनुष्का ठाकरे या विजयी झाल्या आहेत.कुडूस गणातून शिवसेनेच्या अस्मिता लहांगे तर चिंचघर गणातून शिवसेनेचे राजेश सातवी हे निवडून आले आहेत. गालतरे गणातून शिवसेनेचे योगेश गवा आणि खुपरी गणातून शिवसेनेचे अमोल पाटील हे प्रचंड मताने विजयी झाले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे शामकांत मोकाशी यांचा पराभव केला. आबिटघर गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीश पाटील हे विजयी झाले आहेत. मांडा गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुचिता फराड या २५५० मते मिळवून विजयी झाल्या आहेत. डाहे गणातून रघुनाथ माळी हे विजयी झाले आहेत. गारगाव गणातून पूनम पथवा जिंकल्या आहेत. पालसई गणातून भाजपच्या सुवर्णा पडवले तर केळठण गणातून भाजपच्या कृपाली पाटील विजयी झाल्या आहेत. सापने बुद्रुक गणातुन मनसेच्या कार्तिका ठाकरे विजयी झाल्या असून मोज गणातून अपक्ष उमेदवार सागर ठाकरे जिंकले आहेत.>अपक्ष उमेदवाराने मारली बाजीमोज गणातील अपक्ष उमेदवार सागर ठाकरे हे दोन मतांनी विजयी झाले आहेत. सागर ठाकरे व शिवसेनेचे दिनेश पटारे यांना मतपेटीत १७२५ अशी समसमान मते मिळाली. पोस्टाद्वारे सहा मते आली होती. त्यात चार मते सागर यांना तर दोन मते दिनेश यांना मिळाली. यात दोन मतांनी अपक्ष उमेदवार सागर ठाकरे विजयी झाले आहेत. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती.>गारगाव गटात तीनही जागांवर राष्ट्रवादीगारगाव गट, गारगाव गण आणि डाहे गण अशा तिन्हीही जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. गारगाव गटात गेल्या वेळेस शिवसेनेची सत्ता होती. मात्र या सत्तेला राष्ट्रवादीने सुरुंग लावला आहे.दिग्गजांना पराभवाचा झटकाजिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती धनश्री चौधरी यांचा आबिटघर गटातून तर पत्रकार शरद पाटील यांचा याच गटातून पराभव झाला. भाजपचे युवा कार्यकर्ते मंगेश पाटील यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते आणि माजी सभापती संतोष बुकले, शिवसेनेचे तालुका प्रमुख यांचे बंधू दिनेश पटारे यांनाही पराभवाची धूळ चाखावी लागली.