शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

खोडाळ्यातील आरोग्य सेवा कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:35 PM

- रवींद्र साळवे  मोखाडा : तालुक्यातील खोडाळा हे महत्त्वाचे ठिकाण आहे. तरीही येथील आरोग्य सेवा रामभरोसे असल्याचे दिसत आहे. ...

- रवींद्र साळवे मोखाडा : तालुक्यातील खोडाळा हे महत्त्वाचे ठिकाण आहे. तरीही येथील आरोग्य सेवा रामभरोसे असल्याचे दिसत आहे. ६ महिन्यांपासून या आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने आदिवासी रु ग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची त्वरित आणि कायमस्वरूपी नियुक्ती न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा खोडाळा ग्रामपंचायतीने दिला आहे.खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात परिसरातील २८ खेडी समाविष्ट होतात. यांसह नाशिक जिल्ह्यातील वैतरणा, देवगाव, टाके आणि श्रीघाट आदी परिसरातूनही या केंद्राकडे रुग्णांचा ओघ मोठ्या प्रमाणावर असतो. यामध्ये बाह्यरुग्ण २०० ते २५० च्या पटीत दररोज तपासले जातात. तर आंतररूग्णांचा भरणाही लक्षणीय आहे.परंतु येथील श्रेणी १ चे वैद्यकीय अधिकारी पद तीन वर्षांपासून तर श्रेणी २ चे पद ६ महिन्यांपासून रिक्त आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करताना दिसतो.खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात रु ग्णांचा वाढता ओघ लक्षात घेऊन येथे बºयाच वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयाची मागणी केली जात आहे. या मागणीला आजपर्यंत अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. उलट येथील रुग्णांना प्राथमिक सेवाही सुरळीत मिळत नसल्याने रुग्णांमध्ये संताप आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी किशोर देसले यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊशकला नाही.याबाबत आम्ही प्रशासनाला पत्रव्यवहार केला आहे. वेळीच दखल घेतली नाही, तर ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडू.- प्रभाकर पाटील, सरपंच, खोडाळा

टॅग्स :Medicalवैद्यकीय