शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

डम्पिंग दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 00:56 IST

भोयदापाडा येथे पालिकेचा घनकचरा प्रकल्प आहे.

नालासोपारा : वसई पूर्वेकडील भोयदापाडा येथील गोखिवरे गावाच्या हद्दीत वसई - विरार महानगरपालिकेचे डम्पिंग ग्राऊंड आहे. तेथील कचऱ्याचे योग्य प्रकारे नियोजन होत नसल्याने आसपास राहणाºया नागरिकांच्या आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ होते आहे. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.भोयदापाडा येथे पालिकेचा घनकचरा प्रकल्प आहे. शहरातून जमा केला जाणारा ओला तसेच सुका कचरा या ठिकाणी आणून टाकला जातो. परंतु, घनकचरा प्रकल्प बंद पडल्याने येथे कचºयाचे ढिग साचले आहेत. मध्यंतरी महानगरपालिकेने तात्पुरता पर्याय म्हणून कचरा ढिगाºयाच्या सपाटीकरणाचे काम हाती घेतले होते. आता तर कचरा पेटत असल्याने वातावरणात पसरणाºया दूषित धुरामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दररोजची दुर्गंधी व घाणीमुळे हैराण झालेल्या ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून सत्ताधारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, नेतेमंडळी तसेच मनपा अधिकाऱ्यांना अधिकाºयांना आमच्या समस्यांबाबत कोणतेही सोयरसुतक नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. रात्री भोयदापाडा आणि आसपासच्या परिसरात कचºयाची दुर्गंधी पसरत असल्याने ग्रामस्थांना श्वासोच्छवास घेणेही दुरापास्त होऊन बसले आहे. तर दुसरीकडे या कचºयाच्या धुरामुळे ग्रामस्थांना श्वसन विकारासह उलट्या, डोळ्यांची जळजळ, पोटदुखी, जुलाब, दमा अशा आजारांना तोंड द्यावे लागत आहे.मनपा घनकचरा व्यवस्थापन अपयशी?वसई विरार मनपाची गोखिवरे येथील सर्व्हे नंबर ३० (हिस्सा क्रमांक अ - ३१, ३२) येथे १९ हेक्टर जागेवर डम्पिंग ग्राऊंड आहे. ठाणे जिल्हाधिकाºयांकडून घनकचरा प्रकल्पासाठी २०१४ मध्ये ५० एकर जागा नि:शुल्क देण्यात आली होती. महानगरपालिकेला १० वर्ष पूर्ण होऊनही गोखिवरे येथील घनकचरा प्रकल्पात निरंक प्रक्रिया होत नाही.सध्या महानगरपालिका क्षेत्रात दररोज ८०० मेट्रीक टन कचरा निर्माण होतो. घनकचरा व्यवस्थापनासाठी महानगरपालिकेने ४१३ कोटींचा प्रकल्प आखला होता. मात्र त्याची अंमलबजावाणी होत असल्याचे दिसून येत नाही. या कचºयाचे वर्गीकरण होत नाही. मिथेन गॅस, जैवइंधन (बायोगॅस) तसेच खत तयार केले जात नाही. परिणामी या कचºयाचे डोंगर दिवसेंदिवस वाढत आहेत.डंपिंग ग्राऊंडवर सध्या घनकचरा प्रकल्प नाही. २०१३ मध्ये तो जळून गेला आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून येथे ओला आणि सुका कचरा वेगळा केला जात आहे.- माधव जवादे, शहर अभियंताडंपिंग ग्राऊंडच्या धुरामुळे या परिसरात राहणाºया रहिवाशांना श्वसनाचे अनेक आजार झाले आहे. धुरामुळे घसा दुखणे आणि डोळ्यांची आग होत आहे.- शंभू चौधरी, गोखिवरेआग लागल्यावर निघणाºया धुरामुळे घराचे दरवाजे, खिडक्या बंद ठेवायला लागते. धुरामुळे घसा खवखवतो, उलटीचाही त्रास होतो.- रेणुका यादव, स्थानिक

टॅग्स :Vasai Virarवसई विरार