डम्पिंग दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 12:55 AM2020-02-01T00:55:49+5:302020-02-01T00:56:16+5:30

भोयदापाडा येथे पालिकेचा घनकचरा प्रकल्प आहे.

Health hazards due to dumping odor, agitation of villagers | डम्पिंग दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

डम्पिंग दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

googlenewsNext

नालासोपारा : वसई पूर्वेकडील भोयदापाडा येथील गोखिवरे गावाच्या हद्दीत वसई - विरार महानगरपालिकेचे डम्पिंग ग्राऊंड आहे. तेथील कचऱ्याचे योग्य प्रकारे नियोजन होत नसल्याने आसपास राहणाºया नागरिकांच्या आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ होते आहे. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
भोयदापाडा येथे पालिकेचा घनकचरा प्रकल्प आहे. शहरातून जमा केला जाणारा ओला तसेच सुका कचरा या ठिकाणी आणून टाकला जातो. परंतु, घनकचरा प्रकल्प बंद पडल्याने येथे कचºयाचे ढिग साचले आहेत. मध्यंतरी महानगरपालिकेने तात्पुरता पर्याय म्हणून कचरा ढिगाºयाच्या सपाटीकरणाचे काम हाती घेतले होते. आता तर कचरा पेटत असल्याने वातावरणात पसरणाºया दूषित धुरामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दररोजची दुर्गंधी व घाणीमुळे हैराण झालेल्या ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून सत्ताधारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, नेतेमंडळी तसेच मनपा अधिकाऱ्यांना अधिकाºयांना आमच्या समस्यांबाबत कोणतेही सोयरसुतक नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. रात्री भोयदापाडा आणि आसपासच्या परिसरात कचºयाची दुर्गंधी पसरत असल्याने ग्रामस्थांना श्वासोच्छवास घेणेही दुरापास्त होऊन बसले आहे. तर दुसरीकडे या कचºयाच्या धुरामुळे ग्रामस्थांना श्वसन विकारासह उलट्या, डोळ्यांची जळजळ, पोटदुखी, जुलाब, दमा अशा आजारांना तोंड द्यावे लागत आहे.

मनपा घनकचरा व्यवस्थापन अपयशी?
वसई विरार मनपाची गोखिवरे येथील सर्व्हे नंबर ३० (हिस्सा क्रमांक अ - ३१, ३२) येथे १९ हेक्टर जागेवर डम्पिंग ग्राऊंड आहे. ठाणे जिल्हाधिकाºयांकडून घनकचरा प्रकल्पासाठी २०१४ मध्ये ५० एकर जागा नि:शुल्क देण्यात आली होती. महानगरपालिकेला १० वर्ष पूर्ण होऊनही गोखिवरे येथील घनकचरा प्रकल्पात निरंक प्रक्रिया होत नाही.
सध्या महानगरपालिका क्षेत्रात दररोज ८०० मेट्रीक टन कचरा निर्माण होतो. घनकचरा व्यवस्थापनासाठी महानगरपालिकेने ४१३ कोटींचा प्रकल्प आखला होता. मात्र त्याची अंमलबजावाणी होत असल्याचे दिसून येत नाही. या कचºयाचे वर्गीकरण होत नाही. मिथेन गॅस, जैवइंधन (बायोगॅस) तसेच खत तयार केले जात नाही. परिणामी या कचºयाचे डोंगर दिवसेंदिवस वाढत आहेत.

डंपिंग ग्राऊंडवर सध्या घनकचरा प्रकल्प नाही. २०१३ मध्ये तो जळून गेला आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून येथे ओला आणि सुका कचरा वेगळा केला जात आहे.
- माधव जवादे, शहर अभियंता

डंपिंग ग्राऊंडच्या धुरामुळे या परिसरात राहणाºया रहिवाशांना श्वसनाचे अनेक आजार झाले आहे. धुरामुळे घसा दुखणे आणि डोळ्यांची आग होत आहे.
- शंभू चौधरी, गोखिवरे

आग लागल्यावर निघणाºया धुरामुळे घराचे दरवाजे, खिडक्या बंद ठेवायला लागते. धुरामुळे घसा खवखवतो, उलटीचाही त्रास होतो.
- रेणुका यादव, स्थानिक

Web Title: Health hazards due to dumping odor, agitation of villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.