शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

फ्रिडन फार्मामुळे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 03:24 IST

फ्रिडन फार्मासिटीकल या कंपनीने आपल्या उत्पादनाचे प्रदूषित पाणी थेट शेजारच्या नाल्यात सोडल्याची बाब समोर आली असून परिसरातील विहिरी, बोअरवेल आदी पाण्याचे स्त्रोत त्यामुळे प्रदूषित झाले आहेत

पालघर : विरेंद्रनगर मधील फ्रिडन फार्मासिटीकल या कंपनीने आपल्या उत्पादनाचे प्रदूषित पाणी थेट शेजारच्या नाल्यात सोडल्याची बाब समोर आली असून परिसरातील विहिरी, बोअरवेल आदी पाण्याचे स्त्रोत त्यामुळे प्रदूषित झाले आहेत. त्यामुळे कंपनी मालकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे पदाधिकारी सुरज धोत्रे यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.पालघरच्या पूर्वेकडील झोराबियन इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स प्लॉट क्र मांक १४, १५, १६ स्थित फ्रिडन फार्मासिटीकल लिमिटेड ही कंपनी येथे औषधांचे उत्पादन करीत आहे. उत्पादनावर प्रक्रिया करून निघणारे रसायनयुक्त रंगमिश्रित दूषित पाणी नजीकच्या नाल्यात छुप्या पद्धतीने सोडले जात आहे. यामुळे हा नैसिर्गक नाला दुषित झाला असून त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. हे प्रदूषित पाणी परिसरातील शेतकºयांच्या शेतात जात असून गायी, म्हशी आदी जनावरे हे पाणी पीत असल्यामुळे त्यांना पोटफुगीचा त्रास सुरु झाला आहे.नाल्या नजीक गोविंद धोडी यांची शेती असून त्यातून भाजीपाल्याची लागवड केली आहे. मात्र मुसळधार पावसामुळे नाल्यातील प्रदूषित पाणी धोडी यांच्या शेतात साचल्याने त्यांचा भाजीपाला कुजला आहे. शेतीवर चालणारा त्याचा उदरनिर्वाह या प्रदुषणामुळे अडचणीत आला आहे. कंपनीवर थातुरमातुर कारवाई केली असल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले. या कारवाई नंतर पुन्हा कंपनी कडून सतत प्रदूषित पाणी सोडले जात असून जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी स्थानिकांच्या आरोग्याशी, जीविताशी, खेळणाºया कंपनी मालकावर तात्काळ कडक कारवाई करावी अशी लेखी मागणी धोत्रे यांनी केली आहे.ही कंपनी छुप्या पद्धतीने रासायनीक व रंगमिश्रित प्रदूषित पाणी या नाल्यात वारंवार सोडत असल्याची तक्र ार या पूर्वीही करण्यात आली होती. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूरच्या अधिकाºयांनी कारवाई करण्याचे आश्वासन देऊन येथील तक्र ारदाराची बोळवण केली असल्याचा आरोप केला जात आहे. या कंपनीचा विद्युत पुरवठा खंडित करून त्यांचे उत्पादन तात्काळ थांबविण्याचे गरज असताना थातुरमातुर कारवाई केली जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणpalgharपालघर