शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

आरोग्य केंद्राचे १ कोटी पाण्यात; सातपाटीवासीयांची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 03:14 IST

रुग्णसेवेच्या तोकड्या व्यवस्थेमुळे गुजरातचा आधार

- हितेन नाईकपालघर : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सातपाटी मधील मागील ९ वर्षांपासून काम सुरू असलेले आणि सुमारे १ कोटी रु पये खर्चून बांधण्यात आलेले प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सध्या धूळ खात पडून आहे. त्यामुळे गावातील गरीब रु ग्णांना उपचारासाठी नाईलाजाने गुजरात अथवा सिल्वासा येथील रु ग्णालयात जायची नामुष्की ओढवत आहे.सातपाटी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ठाणे जिल्हा परिषदेच्या आणि ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून १९८० साली बांधण्यात आली होती. ३० वर्षाच्या वापरा नंतर सदर इमारत जीर्ण झाल्याने इमारतीच्या छपराचे प्लास्टर, सज्जे धडाधड खाली कोसळू लागले होते. त्यामुळे रुग्ण आणि अधिकारी, कर्मचारी यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने जून २००९ साली’ सातपाटी आरोग्य केंद्रच आजारी अश्या आशयाचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत ठाणे जिल्हापरिषदेचे तत्कालीन आरोग्य सभापती पांडुरंग पाटील यांनी आरोग्य केंद्राला भेट देत नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले होते. मात्र, ठाणे जि.प. मधील बांधकाम विभागातील अभियंत्यांनी नवीन इमारतीचा प्रस्ताव पाठविण्या ऐवजी ६ लाख ५० हजाराचा निधी डागडुजीसाठी मंजूर करु न घेतला.डागडुजीच्या कामाला सुरु वात झाल्या नंतर नवीन काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्या नंतर काही दिवसातच नवीन बांधकाम कोसळले. त्यामुळे लाखो रुपयांचा निधी वाया जात रुग्णांच्या जीवितहानीस जबाबदार कोण? असा प्रश्न पुन्हा वृत्ताद्वारे उपस्थित केल्या नंतर तत्कालीन आमदार आणि विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यांनी सर्व पाहणी करून निधी रद्द करण्यास लावला. जिल्हा नियोजन सभेत हा प्रश्न लावून धरीत सुमारे १ कोटी ६ लाखाचा निधी मंजूर करून घेतला आणि त्याचे भूमिपूजन त्यांनी केले होते. त्या भूमीपूजनाला आज ९ वर्षाच्या कालावधी लोटला असून हे प्राथमिक आरोग्य केंद्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आजही सुरू झालेले नाही.नवीन प्रा. आ. केंद्र मंजूर झाल्यानंतर जुने पाडून त्याठिकाणी नवीन इमारतीचे काम सुरू व्हायलाच दोन वर्षाचा कालावधी लागला. अनेक अडचणींवर मात करीत शेवटी २०१० मध्ये सुरू झालेल्या या इमारतीचे काम पूर्ण करण्यास ठेकेदारांच्या पुढे अनेक अडचणी निर्माण होत गेल्या. आज मागील एक ते दीड वर्षांपासून इमारतीचे काम पूर्ण झाले असून पाण्याची टाकी आणि बोअर दुरु स्तीच्या कामासाठी पंचायतसमितीच्या पाणी पुरवठा विभागाला तब्बल दीड वर्षाचा कालावधी लागावा यातच प्रशासनाची उदासीनता दिसून येते.या बाबत सातपाटीतील काही जागृत ग्रामस्थांनी बीडीओ डॉ.घोरपडे यांची ११ जून रोजी भेट घेतल्यानंतर हे काम ठेकेदाराने तात्काळ सुरू केले. मात्र ३ महिन्याचा कालावधी व्हायला आल्यानंतरही हे काम आजही पूर्ण होत नसल्याने रुग्णालयाचे कामकाज सुरू होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर इमारत पूर्णत्वाचा दाखला मिळाल्या शिवाय आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सुरू करू शकत नसल्याचे प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.बारा गावांची रुग्णसेवा सरकारी शाळेतूनसातपाटी आरोग्य केंद्राशी सातपाटी १, सातपाटी २, शिरगाव, खारेकुरण, मोरेकुरण, आदी एकूण बारा गावांशी जोडण्यात आले असून असंवेदनशील अधिकाºयांमुळे मागील आठ वर्षांपासून लहान बालके, गरोदर स्त्रिया, वृद्ध रु ग्ण यांची उपचाराबाबत ससेहोलपट सुरू आहे. सध्या सातपाटीचे प्रा.आ.केंद्र गत नऊ वर्षांपासून एका जुन्या शाळेत सुरु आहे.डॉक्टर वेळेवर न येणे, रात्रीच्यावेळी आरोग्य केंद्रात उपस्थित नसणे आदी रु ग्णांच्या अनेक तक्र ारी असून १ लाख रु ग्णांची भिस्त असलेल्या रु ग्णालयाची सुंदर इमारत बांधून तय्यार असतानाही तिचे कामकाज सुरु झालेले नाही. आरोग्य सेवे सारख्या महत्वपूर्ण सेवे बाबतच्या उदासीनतेचा फटका सातपाटीसह अन्य बारा गावातील गरजू रुग्णांना बसत आहे.तारीख पे तारीख : रुग्णांच्या उपचारासाठी मागील दोन वर्षांपासून उभी असलेली सातपाटी प्राथमिक रु ग्णालयाची इमारत. जून २०१० साली लोकमतने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर तत्कालीन आमदार राजेंद्र गावित यांनी प्रा.आ.केंद्राला भेट देत पाहणी केली होती.

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीयpalgharपालघर