शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Shraddha Walker Case : श्रद्धा वालकरचे निवेदन सोशल मीडियावर व्हायरल, आपले तुकडे करणार असल्याचे तक्रारीत आहे नमूद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 17:34 IST

श्रद्धा हत्याकांडात देशभरात संताप व्यक्त होत असताना तसेच रोज नवनवीन खुलासे होत आहेत.

मंगेश कराळेनालासोपारा : श्रद्धा हत्याकांडात देशभरात संताप व्यक्त होत असताना तसेच रोज नवनवीन खुलासे होत आहेत. तिने लिहलेली पोलीस तक्रारीची प्रत बुधवारी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून व्हायरल झाल्याने या संतापात आणखी भर पडली आहे. 

लोकांच्या दोन्ही बाजूने प्रतिक्रिया येऊ लागल्याने पोलीस प्रशासनाच्या विरोधातही जनप्रक्षोभ उसळला. नोव्हेंबर २०२० मध्ये तुळीज पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीमधे आफताब आपणास सहा महिन्यापासून मारहाण करत असून तो आपले शरीराचे तुकडे करून फेकून देईल अशी धमकी दिली असल्याचे नमूद आहे. महत्त्वाचे म्हणजे आफताब आपल्याला ब्लॅकमेल करीत आहे. ब्लॅकमेल कशाच्या आधारे केले जात आहे याचा उल्लेख नाही त्यामुळे पोलिसांनी या बाबीवर तपास करणे आवश्यक होते. आज स्थितीतही दिल्ली पोलिसांनी यावर तपास करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

या पत्रानुसार, आफताब मारहाण करीत असल्याची तसेच ठार मारणार असल्याची कल्पना त्याच्या कुटुंबीयांना आहे. ही अजून धक्कादायक बाब उघड झाली आहे. "आज त्याने मला गुदमरून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तो मला घाबरवतो आणि ब्लॅकमेल करतो. तो मला ठार करेल आणि जागोजागी कापून फेकून देईन." असा स्पष्ट उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे. तब्बल २ वर्षांनी तिची ही शक्यता तंतोतंत खरी ठरली आहे. पोलिसांनी या प्रकरणी काय कारवाई केली? त्यांनी योग्य कारवाई केली असती तर तिचा जीव वाचला असता अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून देण्यात येत आहेत.

सदर बाबत अधिक माहिती संकलित केली असता, नोव्हेंबर २०२० मध्ये श्रद्धाला आफताबने एव्हरशाईन वसई येथे राहत असताना गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा तिला तुळींज पोलीस ठाण्यात मित्र घेऊन गेला होता. तुळींज पोलिसांनी लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहत असल्याने अर्ज देण्यास सांगून मेडिकल करून येण्यास सांगितले होते. पण तिने याकडे कानाडोळा केला. परंतु ती मेडिकल साठी गेलीच नाही. ती मेडिकल करण्यासाठी का गेली नाही? कोणत्या कारणामुळे तिने माघार घेतली हा प्रश्न अनेकांना पडला आहे. तेव्हा तिने मेडिकल व गुन्हा दाखल केला असता तर आज श्रद्धा जीवंत असती असे तिचा मित्र राहुल राय याने सांगितले आहे. आफताबने तिला अनेक वेळा मारहाण केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सोशल मीडियावर श्रद्धाचे पत्र व्हायरल होत आहे याबाबत आपण काही सांगू शकत नाही. तिच्या तक्रारीवर चौकशी तुळींज पोलिसानी केलेली आहे. चौकशी दरम्यान आपली कोणतीही तक्रार नसून मी दिलेली तक्रार मागे घेत आहे. असे स्टेटमेंट पोलीस ठाण्यात दिले होते.सुहास बावचे (पोलीस उपायुक्त, परिमंडळ तीन)

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकर