शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सागरी महामार्गाच्या विरोधात एकजूट, शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 06:03 IST

सुमारे १० वर्षांपासून रखडलेल्या प्रस्तावित सागरी महामार्गाला आता नव्याने पुनरु जिवीत करण्याचा प्रयत्न शासन पातळीवरून केला जात असताना ज्या शेतक-यांच्या जमिनी ह्या मार्गात जातात त्यांना विचारायचे साधे सौजन्यही प्रशासन पाळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकºयानी जिल्हाधिका-यांची भेट घेत आपला रोष व्यक्त केला.

- हितेन नाईकपालघर - सुमारे १० वर्षांपासून रखडलेल्या प्रस्तावित सागरी महामार्गाला आता नव्याने पुनरु जिवीत करण्याचा प्रयत्न शासन पातळीवरून केला जात असताना ज्या शेतक-यांच्या जमिनी ह्या मार्गात जातात त्यांना विचारायचे साधे सौजन्यही प्रशासन पाळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकºयानी जिल्हाधिका-यांची भेट घेत आपला रोष व्यक्त केला.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परनाली- मोरेकुरण-आगवन-दापोली असा सुमारे ९ किमी आणि २५ कोटींचा सागरी महामार्ग सन २००७-०८ च्या सुमारास बांधावयास घेण्यात आला होता. समुद्राशी काडी मात्र संबंध नसलेल्या ह्या सागरी महामार्गाची उभारणीच चुकीच्या आधारे झाल्यानंतर अनेक वर्षांपासून तो व दुधखाडीवर उभारलेल्या पुलाचे काम बंद होते.झाई-बोर्डी-दापोली-रेवस-रेड्डी असा कोकणपर्यंत जाणाºया ह्या सागरी महामार्गाच्या रस्त्याच्या अपूर्णावस्थेतील कामे पूर्णत्वास नेण्याबाबत इथला लोकप्रतिनिधी उदासीन होता. जिल्हा निर्मिती नंतर पुन्हा ह्या रखडलेल्या रस्त्याच्या कामाला सुरु वात करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने बाधित शेतकºयांनी जिल्हाधिकाºयकडे हरकती नोंदवून तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यामुळे शेतकºयांशी चर्चा करण्याची इच्छा जिल्हाधिका ºयांनी व्यक्त करून त्यांना गुरु वारी चर्चेला बोलाविले होते. शेतकºयांना विश्वासात न घेता निवीदा प्रकीया काढली गेल्याने संबंधीत महामार्गातील बाधित शेतकरी हे संतप्त झाले असून प्रथम आमच्या जमिनीचा मोबदला द्या नंतरच कामाला सुरु वात करा. अन्यथा या विरोधात सरकारशी दोन हात करण्याच्या आम्ही तयार आहोत असा इशारा उपस्थित निर्धार संघटनेचे अध्यक्ष कुंदन संखे यांनी दिला.सरकारच्या दडपशाहीचा केला निषेधहा सागरी महामार्ग अनेक वर्षांपासून रखडलेला असून अनेक शेतकºयांच्या जमिनीत चुकीच्या पद्धतीने वृक्ष तोड करून, मातीचा भराव केल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच मोरेकुरण, दापोली, आंबेडकर नगर, कुंभवली गावातील प्रभावित शेतकºयांनी सरकारच्या दडपशाही धोरणाचा निषेध करून आंदोलने केली असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले असता, प्रशासनाचे धोरण हे शेतकºयांना पूरक व त्यांना संपूर्ण विश्वासात घेऊनचं आखण्यात येईल. असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.रस्त्याच्या निवीदा तातडीने थांबवण्याचे आदेश देऊन, उपस्थित असलेले उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सा. बां. वि. चे कार्यकारी अभियंता, भूसंपादन अधिकारी, यांना सागरी महामार्गा बाबतचे धोरण शेतकºयांना विश्वासात घेऊनच निश्चित करण्याचे स्पष्ट आदेश संबंधित अधिकाºयांना दिल्याचे कुंदन संखे यांनी सांगितले.यावेळी सुनिल राऊत, तसेच गणेश पिंपळे, प्रल्हाद संखे, रु पेश संखे, निलीम संखे, सुधाकर संखे, ललित संखे, दशरथ संखे,आदी उपस्थित होते. यावेळी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी जिल्हाधिकाºयांना परिस्थितीचे वास्तव पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी