शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

वाड्यातील २१ गावांत भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: May 1, 2016 02:34 IST

उन्हाचा पारा जसजसा वाढू लागला आहे तशी वाडा तालुक्यातील अनेक गावपाड्यांमध्ये आदिवासींना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातून तब्बल पाच बारमाही नद्या वाहत

वाडा : उन्हाचा पारा जसजसा वाढू लागला आहे तशी वाडा तालुक्यातील अनेक गावपाड्यांमध्ये आदिवासींना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातून तब्बल पाच बारमाही नद्या वाहत असताना देखील केवळ शासकीय अनास्थेमुळे नागरीकांना घोटभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.तालुक्यातून पिंजाळ, देहर्जे, गारगाई, तानसा, वैतरणा अशा तब्बल पाच बारमाही वाहणाऱ्या नद्यांची देणगी निसर्गाने दिली असताना शासकीय धोरणांमुळे व स्थानिक आमदार, खासदार, मंत्र्यांच्या अकार्यक्षमतेमुळे येथील गावपाड्यांतील आदिवासींच्या घशाला ३० वर्षापासून कोरड पडली आहे. तालुक्यातील टोकरेपाडा, उज्जैनी, गावठाण, आंबेवाडी, साखरशेत, दिवेपाडा, सागमाळ, जांभूळपाडा, थावरपाडा, ओगदा, बालशेत पाडा, वरठापाडा (नाणे), वळवीपाडा (कोंढले), गाळतरे (धुसालपाडा), गुहीर, खुटल, आमगाव, अंभई, शेलटे, मुगूस्ते, साईदेवळी या गावपाड्यातील आदिवासींना घोटभर वणवण भटकावे लागत आहे. काही गावांना अनियमीत टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे तर काही गावे प्रतिक्षेत आहेत.पाणीटंचाई रोखण्यासाठी जलस्वराज्य प्रकल्प, पाणीपुरवठ्याच्या विविध योजना, लहान मोठे बंधारे, बोअरवेल, सिंचन तलाव, विहिरी यासाठी करोडो रुपये खर्ची पडले आहेत. मात्र कागदी घोडे नाचवून विहिरी व खडकावर पोखरलेल्या कोरड्या बोअरवेल या व्यतिरीक्त काही आलेले नाही. कोकाकोला कंपनीने गांध्रे येथे वैतरणा नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यातुन थेंबभर पाण्याचीही गळती होत नाही व कंपनीला कधीही पाणीटंचाई जाणवत नाही. मात्र आमच्या गोरगरीब जनतेला मार्च महिन्यापासून पाण्यासाठी पायपीट करावी लागते व तहानेने व्याकुळ होऊन याच कंपनीने तयार केलेले मिनरल वॉटर विकव घेऊन पाणी प्यावे लागते. (वार्ताहर)पहाटेपासून पाण्याचा शोधतालुक्यातील अनेक गावातील महिलांना पहाटेपासूनच पाण्याच्या शोधात निघावे लागते. अनेक गावपाड्यांतील विहिरींनी नळ गाठल्याने पाच किलोमीटर दुर नदीवर डोक्यावर हांडे घेवून पायपीट करावी लागत आहे.वाडा तालुक्यात १९६ बोअरवेल मंजुर झाल्या आहेत. मात्र त्या प्रशासकीय मंजुरीच्या प्रतिक्षेत असून येथील सहा गावांना टँकर सुरू करण्यात आले आहे. मात्र त्याला डिझेल व बिल लवकर निघत नाही शिवाय प्रशासन पाणी देखील वेळेवर उपलब्ध करून देत नसल्याने या गावांना टँकर सुरू असून पाणी मिळत नसल्याची येथील आदिवासी नागरीकांनी व्यक्त केली.या संदर्भात वाडा पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता संतोष शिर्शिकर यांच्याशी संपर्क साधला असता १९६ बोअरवेल मंजुर आहेत मात्र त्यांना प्रशासकीय मंजुरी व वर्कआॅर्डर मिळालेली नाही. शिवाय सहा गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला असून दोन गावे प्रतिक्षेत असल्याची माहिती त्यांनी दिली.