शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीडची वाहिनी कोसळली; भरपाईशिवाय पुन्हा उभारू न देण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 03:26 IST

विक्रमगड तालुक्यातील हातने गावावरून जाणारी पॉवर ग्रीडची ४०० केव्ही व ४ लाख व्होल्टची वाहिनी तुटली असून शेतात काम करणारे १० शेतकरी या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत.

तलवाडा : विक्रमगड तालुक्यातील हातने गावावरून जाणारी पॉवर ग्रीडची ४०० केव्ही व ४ लाख व्होल्टची वाहिनी तुटली असून शेतात काम करणारे १० शेतकरी या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत.दोनच महिन्यापूर्वी ही लाईन चालू करण्यात आली असून यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण असून ते शेतात जाण्यास घाबरत आहेत. जो पर्यंत सुरक्षिततेची हमी ग्रीड देत नाही तो पर्यंत आम्ही हि केबल जोडू देणार नाही अशी भूमिका शेतकºयांनी घेतली आहे. या गावातील शेतकरी शुक्र वारी संध्याकाळी शेतात काम करीत असतांना जोरदार स्फोट झाला त्यानंतर त्यांनी जीव वाचविण्यासाठी पळ काढला. पॉवर ग्रीड कंपनीची वीज वाहिनी तुटल्याचे त्यांच्या लक्षात आले. ग्रीडच्या अधिकाºयांना कळविले तरी तिचा एकही अधिकारी त्या ठिकाणी पोहचला नव्हता आज सकाळी ग्रीडचे अधिकारी आपला लवाजमा घेऊन गावात पोहचले असता त्यांना शेतकºयांनी त्यांना घेराव घालून जाब विचारला की या घटनेला १८ तास उलटले आणि तुम्ही आता येता? ते केबल जोडण्यासाठी जात असतांना गावकºयांनी त्यांना आमच्या सुरक्षिततेची हमी द्या नंतर केबल जोडा असे सांगून त्यांना काम करण्यास मज्जाव केला. आमच्या शेतात तुम्ही टॉवर लाईन टाकली आमची झाडे तुम्ही तोडली त्याची नुकसान भरपाई दिली नाही ती अगोदर द्या तरच आम्ही तुम्हला हे काम करू देऊ असे बजावले. या बाबत पॉवर ग्रीड कंपनीच्या अधिकाºयांना विचारले असता त्यानी पत्रकारांशी काहीही बोलण्यास नकार दिला.मी व माझे कुटुंबिय शेतात काम करीत असतांना पॉवर ग्रीडची विद्युत वाहिनी तुटल्याने मोठा स्फोट झाला. ही वाहिनी शेजारच्या शेतात पडल्याने आम्ही वाचलो ती जर या शेतात पडली असती तर आमचा मृत्यू अटळ होता. यामुळे आम्हाला आता शेतात काम करण्याची भीती वाटते.-शशिकांत तारवी,प्रत्यक्षदर्शी शेतकरीआमच्या शेतात पॉवर लाईन टाकतांना आमच्या मालकीची झाडे तोडली त्याची नुकसान भरपाई अद्याप पर्यंत मिळाली नाही. पॉवर ग्रीडच्या अधिकाºयांनी आम्हला लेखी लिहून दिली आहे की येत्या एक महिन्याचा आत शेतकºयांची नुकसान भरपाई देऊ.-नितीन डोळे,प्रकल्प बाधित शेतकरी

टॅग्स :Vasai Virarवसई विरार