शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

शासकीय अधिकारीच खंडणीला जबाबदार, चौकशी व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 06:19 IST

- शशी करपेवसई - तालुक्यात सुरु असलेल्या खंडणी प्रकरणात वसई विरार महापालिका आणि पोलीसच जबाबदार असून २००९ पासून दाखल झालेल्या अर्जांची चौकशी केल्यावर अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येतील, असे काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.२००५ साली माहिती अधिकार अस्तित्वात आल्यानंतर वसईत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर खंडणीचे गुन्हे ...

- शशी करपेवसई - तालुक्यात सुरु असलेल्या खंडणी प्रकरणात वसई विरार महापालिका आणि पोलीसच जबाबदार असून २००९ पासून दाखल झालेल्या अर्जांची चौकशी केल्यावर अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येतील, असे काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.२००५ साली माहिती अधिकार अस्तित्वात आल्यानंतर वसईत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर खंडणीचे गुन्हे दाखल झाले आहेत. जनतेकडून अनधिकृत बांधकाम आहे हे कळल्यानंतरही त्या बांधकामांवर वसई विरार महापालिकेकडून कारवाई झाली असती तर सामाजिक कार्यकर्त्याला खंडणी देण्यासाठी विकासकांनी पुढाकार घेतला नसता. तसेच महाराष्ट्र पोलीस महासंचालकांनी लोकांची फसवणुक करणाऱ्या विकासकांवरही गुन्हे दाखल कराअसे स्पष्ट निर्देश पालघर पोलीस अधिक्षकांना दिले आहेत. त्यामुळे गुन्हे कोणावर दाखल करावेत हे पोलिसांनीच ठरवले पाहिजे, अशी तक्रार काँग्रेसच्या विरार शहरअध्यक्षा गीता वेर्णेकर यांनी केली आहे.अनधिकृत बांधकामे झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई न करता महापालिका अधिकारी संरक्षण देतात. त्यामुळे माहिती अधिकाराचे अर्ज, तक्रारी दाखल होतात. त्यानंतर महापालिका आणि पोलीस अधिकारीच संबंधित बिल्डर व तक्रारदाराची समेट घडवून आणतात. तिथूनच खंडणीच्या प्रकाराला सुरुवात होते. खंडणी मागणाºयांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, अनधिकृत बांधकामांना खतपाणी घालणाºया व खंडणीचा मार्ग दाखवणाºया अधिकाºयांवर कारवाई केली जात नाही, अशी तक्रार उत्तराखंड वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश सभापती यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. एमआरटीपीची तक्रार आल्यानंतर पोलिसांकडून सेटलमेंट केली जाते. काही आरटीआय कार्यकर्त्यांना पोलीसच हाताशी धरुन आर्थिक फायदा करून घेतात. यासाठी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी केल्यास खंडणी प्रकरणात महापालिका आणि पोलिसांचा सहभाग निश्चित उजेडात येईल, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या तक्रारीत म्हटले आहे.अनधिकृत बांधकाम करणाºयांकडून खंडणी वसूली करण्यात एकटे आरटीआय कार्यकर्ते नसून त्यात शासकीय अधिकाºयांचाही सहभाग आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत करावी व त्यांच्या अहवालानुसारच कारवाई झाल्यास अनेक धक्कादायक बाबी उजेडात येतील, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सदस्य अ‍ॅड. जीमी घोन्सालवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.पोलीस कोठडीत बेदम मारहाणखंडणी प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या रमेश मोरे यांनी आपणाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप न्यायालयात केला. न्यायालयाने याप्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. माहिती अधिकारात माहिती मागवून बिल्डरांकडून खंडणी उकळल्या प्रकरणी वसई विरार परिसरात सध्या तब्बल दहा गुन्हे दाखल झाले आहे. त्यातील विरार पोलीस कोठडीत असलेल्या मोरे यांना बुधवारी संध्याकाळी वसई कोर्टात हजर केले असताना आपणाला तपाशी अधिकारी सोनावणे व राठोड यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने मोरे यांच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश देऊन याप्रकरणाच्या चौकशीचेही आदेश दिले. पोलिसांनी चौकशीदरम्यान केलेल्या मारहाणीमुळे त्यांना चालताही येत नसल्याचे अ‍ॅड. रमेश घोन्सालवीस यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, विरार येथील खंडणी प्रकरणात विवेक ठाकूर यांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी त्यांचे वकिल नोएल डाबरे यांनी युक्तीवाद करताना हेतुपुरस्सर ही कारवाई होत असल्याचे सांगितले. ज्या बिल्डरांवर गुन्हे दाखल आहेत, त्यांना अटक केली जात नाही. अनधिकृत बांधकाम करणारे बिल्डर तक्रार करतात त्यात गुन्हा दाखल करून लगेचच अटक केली जात असल्याचे डाबरे यांनी न्यायालयात सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या