शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

सरकारी भात खरेदीचे पैसे रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 00:54 IST

शेतकरी अडचणीत : कर्ज फेडायचे कसे अन् खायचे काय?

लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : कोरोनामुळे आधीच संकटात असताना आधारभूत भात खरेदी केंद्रावरून भात खरेदीची रक्कम खात्यात जमा न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. लॉकडाऊन असताना शेतीच्या कामात सूट दिली असतानाही हातात पैसे नसल्यामुळे शेतीची कामे कशी करायची, हा प्रश्न शेतकरी वर्गापुढे उभा राहिला आहे. तसेच मार्चअखेरीस शेतकऱ्यांना घेतलेले पीक कर्ज भरावे लागते, ते कसे फेडायचे या विवंचनेत ते सापडले आहेत.

सहकारी सोसायटीकडून घेतलेले कर्ज शेतकरी भात विकून भरत असतो, पण शासनाच्या भात खरेदी केंद्रावर भात विकूनही दोन महिन्यांपासून पैसे मिळाले नसल्याने आम्ही कर्ज भरायचे तरी कसे, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. यावर्षी दरात वाढ करून १८५० व ५०० रुपयांचा बाेनस असा दर लागू झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत हाेते. या वर्षी झालेल्या नुकसानीनंतर भात खरेदी केंद्रांवर चांगला भाव मिळाल्याने हाती चांगले पैसे पडतील, अशी आशा शेतकऱ्यांना हाेती. भात पीक घेणे हे आता शेतकऱ्यांसाठी महागडे ठरत आहे. बी बियाणे, खते, औषधे, मजुरी, ट्रॅक्टरचे वाढणारे दर, निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकऱ्यांना भात पीक घेणे परवडत नाही. 

भात पिकाची लागवड करून हाती येणाऱ्या पिकातून खर्च वजा करून हाती काहीच उत्पन्न पडत नाही. व्यापारी भाताला क्विंटलला १२०० ते १५०० रुपयांचा भाव देतात. ही पिळवणूक थांबवण्यासाठी वसईतील शेतकऱ्यांचे भात खरेदी करण्यासाठी राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित प्रादेशिक कार्यालय जव्हार अंतर्गत वसई तालुक्यात दोन भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आली. त्याअंतर्गत शिरवली, मेढे व भिनार या ठिकाणी भात खरेदी सुरू करण्यात आली.

महामंडळाला कागदपत्रे सादरजानेवारीपासून भात खरेदी सुरू झाली. मात्र, शेतकऱ्यांनी या केंद्रात विकलेल्या भाताचे पैसे अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमाच झाले नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. आदिवासी विकास महामंडळाकडे याबाबतची कागदपत्रे सादर केली आहेत. मंडळाकडे निधी मंजूर होताच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडणार असल्याचे अधिकारी कल्पेश चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार