शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावरील गांधी स्मारकाला येणार अच्छे दिन

By admin | Updated: June 1, 2017 04:33 IST

अर्नाळा समुद्रकिनारी अर्नाळा-वैतरणेच्या त्रिवेणी संगमावर महात्मा गांधींच्या अस्थि विसर्जनानंतर साकारण्यात आलेल्या स्मारकाच्या

शशी करपे/लोकमत न्यूज नेटवर्कवसई : अर्नाळा समुद्रकिनारी अर्नाळा-वैतरणेच्या त्रिवेणी संगमावर महात्मा गांधींच्या अस्थि विसर्जनानंतर साकारण्यात आलेल्या स्मारकाच्या दुर्दशेचा वृत्तांत लोकमतने प्रसिद्ध करताच त्याची दखल ग्रामपंचायत व पोलिसांनी तातडीने घेतली व या स्मारकाची नित्य स्वच्छता केली जाईल व ती राखण्यासाठी सुरक्षारक्षकही नेमला जाईल, अशी लेखी ग्वाही दिली. या स्मारक परीसरात दारुडे पार्ट्या झोडतात. बेवारस कुत्र्यांनी आश्रय घेतला आहे. साफसफाई तर होतच नसल्याने चोहोबाजूंला घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यावर लोकमतने प्रकाशझोत टाकताच याठिकाणी नियमित स्वच्छता केली जाईल आणि कायमस्वरुपी सुरक्षा रक्षक तैनात केला जाईल, असे लेखी पत्र पोलीस व ग्रामपंचायतीने समाजसेवक दत्तात्रेय कराळे यांना दिले आहे. राष्ट्र्पिता महात्मा गांधी यांच्या निधनानंतर त्यांच्या ८ जानेवारी १९४८ रोजी अस्थींचे अर्नाळा समुद्रकिनारी असलेल्या अर्नाळा-वैतरणेच्या त्रिवेणी संगमावर विसर्जन करण्यात आले होते. त्याच्या स्मृत्यर्थ त्याठिकाणी एक स्मारक बांधण्यात आले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचे पावित्र्यच धोक्यात आले होते. गांधी स्मारकाच्या वास्तूची निगा राखण्यासाठी कायमस्वरुपी रखवालदार नाही. त्यामुळे याठिकाणी दारुडे खुलेआम दारु पित बसलेले असतात. स्मारकाच्या आवारात दारुच्या रिकाम्या बाटल्या आणि खाद्यपदार्थांची रिकामी पाकिटे फेकलेली आढळून येतात. भिकारी, गर्दुल्ले यांचा याठिकाणी नेहमी राबता असतो. भटक्या कुत्र्यांनी तर स्मारक आपले निवासस्थान बनवले आहे. नियमित सफाई केली जात नसल्याने केरकचरा साचलेला दिसून येतो. मात्र, स्मारकाची कुणीच निगा राखत नसल्याने त्याचे पावित्र्य धोक्यात आले आहे. ते राखावे अन्यथा आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रेय कराळे यांनी दिला होता. तो ही या लेखी ग्वाही मुळे कारणी लागला आहे, आता त्याप्रमाणे घडते कधी याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.