शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

मत्स्य व्यवसायाला तातडीने कृषीचा दर्जा द्या!, खासदार गावित यांची लोकसभेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 23:37 IST

राज्य सरकारने या वर्षी ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी असणाºया १५१ तालुक्यातील हजारो गावांना दुष्काळाच्या निकषाखाली आणून सुमारे २ हजार ९०० कोटी रुपयांची मदत दिली.

- हितेन नाईकपालघर : शेतकऱ्याप्रमाणे मच्छिमार ही मत्स्य दुष्काळाच्या खाईत होरपळत असून त्यांनाही शेतकºयाप्रमाणे नुकसान भरपाई व कर्जपुरवठा देण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाला कृषी विभागाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी तारांकित प्रश्नाद्वारे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी लोकसभेत केली आहे.राज्य सरकारने या वर्षी ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी असणाºया १५१ तालुक्यातील हजारो गावांना दुष्काळाच्या निकषाखाली आणून सुमारे २ हजार ९०० कोटी रुपयांची मदत दिली. ही मदत दोन टप्प्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले होते. हंगामी पीक उत्पादक शेतकºयांना कमीत कमी १ हजार तर फळबाग शेतकºयांना कमीत कमी २ हजार रुपये मिळणार होते. तर दुष्काळाच्या निकषाखाली आणलेल्या गावांना कृषिपंप वीज बिलात ३३.५ टक्के सवलत, एसटी प्रवास मोफत, विद्यार्थ्यांच्या परीक्षा फीमध्ये माफी, जमीन महसूलात सूट आदी सवलती जाहीर करून तत्काळ धान्य खरेदी केंद्रे सुरू करीत त्यांना सावरण्याचे काम केले होते.सध्या परंपरागत मच्छीमारांची संख्या रोडावत असून प्रगत तंत्रज्ञानाचा फायदा घेत बिगर मच्छिमारांनी या व्यवसायात मोठ्या प्रमाणात शिरकाव सुरू केला आहे. एलईडी पर्ससीन नेट, बॉटम ट्रोलिंग आदी विविध तंत्रज्ञानाने विकसित पद्धतीने चालवलेल्या बेसुमार मासेमारीमुळे समुद्रातील मत्स्य साठ्यांचे प्रमाण कमालीचे घटले आहे. त्यामुळे मच्छीमारांवर मत्स्य दुष्काळाचे सावट अधिकाधिक गडद होत चालले आहे. मच्छीमारावर केंद्र व राज्य शासनाचे १ हजार कोटीच्यावर कर्ज असून ते माफ करावे, अशी मागणी सहकारी संस्था व शिखर संस्था मागील अनेक वर्षांपासून करीत आहेत. प्रत्येक वर्षी अतिवृष्टी, अवेळी पडणारा पाऊस, गारपीट, पाणी टंचाई आदी कारणामुळे शेतकºयांचे नुकसान झाल्यास त्यांना दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे कर्जमाफी देऊन अत्यल्प दराने फेर कर्ज वाटपही केले जाते. मात्र वर्षाला कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन आणि पौष्टिक, सकस आहार पुरविणाºया मच्छिमार समाजाचे १ हजार कोटींची कर्ज माफ करण्यास मात्र शासन कुचराई करीत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.पंतप्रधानांनी स्वतंत्र मत्स्य व्यवसाय मंत्रालयाची स्थापना केल्याचे घोषित केले असल्याने त्यासाठी एका स्वतंत्र निधीची तरतूद बजेटमध्ये करण्यात येणार असल्याने मच्छीमारामध्ये आनंदाचे वातावरण आहे.पशु, दुग्ध व मत्स्यव्यवसाय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिह यांनी मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याच्या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करावा, अशी मागणी ही यावेळी गावितांनी केली.महत्त्वाचा मुद्दा मांडला!कर्ज असह्य झाल्यावर शेतकरी आत्महत्या करतो, त्यानंतर केंद्र व राज्य शासनाकडून त्यांना भरपाई दिली जाते. त्याच धर्तीवर मच्छीमारांनी आत्महत्या केली अथवा तो कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला तर त्याला मात्र कुठल्याही पद्धतीची नुकसान भरपाई दिली जात नसल्याचे खासदार गावित यांनी लोकसभच्या निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :palgharपालघर