शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
4
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
5
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
6
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
7
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
8
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
9
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
10
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
11
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
12
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
13
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
14
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
15
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
16
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
17
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
18
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
19
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
20
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?

पालघर जिल्ह्यांत मुलींची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 23:57 IST

वसई तालुक्याचा निकाल सर्वाधिक ७९.७७ । विक्रमगड सर्वात कमी ४७.६० टक्के

पालघर : पालघर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ७१.७५ लागला असून यामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्यातील मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ७५ टक्के आहे तर मुलांची टक्केवारी ६८.९२ आहे, या परीक्षेत ८ तालुक्यामधून बसलेल्या ५७ हजार ९२२ विद्यार्थ्यांपैकी ४१ हजार ५९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

वाडा तालुक्यातून ३२६६ मुले परीक्षेला बसले होते यापैकी २००८ मुले उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी ६१.३९ इतकी आहे. मोखाडा तालुक्यातून १२८४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ७६० मुले उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी ५९.१९ आहे. विक्रमगड तालुक्यातून २९३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी १,३९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यांची टक्केवारी ४७.६ आहे. जव्हार तालुक्यातून २२४६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते तर यातून १२७७ मुले उत्तीर्ण झाले या तालुक्याची टक्केवारी ५६.८६ आहे. तलासरी तालुक्यातून ४ हजार ७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते यापैकी २३०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या तालुक्याची टक्केवारी ५६.७२ इतकी आहे. डहाणू तालुक्यातून पाच हजार ९२८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते यापैकी ३७७२ विद्यार्थी पास झाले या तालुक्याची टक्केवारी ६३.५३ इतकी आहे तर पालघर तालुक्यातून ८१७० मुलांनी दहावीची परीक्षा दिली. यामध्ये ६०९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या तालुक्याची टक्केवारी ७४.५ आहे.जिल्ह्यामध्ये पालघर तालुका हा टक्केवारीमध्ये द्वितीय क्रमांकावर आहे तर वसई तालुक्यात सर्वाधिक विद्यार्थी परीक्षेस बसले होती त्यांची आकडेवारी तीस हजार वीस इतकी असून यामध्ये २३ हजार ९४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या तालुक्याची टक्केवारी ७९.७७ टक्के तर इतकी आहे. वाडा तालुक्यातील ३३ शाळा मोखाडा तालुक्यातील १८ शाळा विक्रमगड तालुक्यातील २७ जव्हार तालुक्यातील ३४ तलासरी तालुक्यातील ४३ डहाणू ३५६ पालघर मधील ८८ वसई मधील २५२ अशा आठही तालुक्यातील एकूण ५५१ शाळांमधून ४१ हजार ५९८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.आठही तालुक्यातून २१ हजार ५७८ मुले तर १९ हजार ९८१ मुली असे एकूण ४१ हजार ५९८ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत यामध्ये आठही तालुक्यांची जिल्ह्याची मुलांची आकडेवारी ही ६८.९२ असून मुलींची आकडेवारी ही ७५.०८ आहे.तालुकानिहाय निकालतालुका टक्केवारीवसई ७९.७७ %पालघर ७४.५ %डहाणू ६३.५३ %वाडा ६१.३९ %मोखाडा ५९.१९ %जव्हार ५६.८६ %तलासरी ५६.७२ %विक्रमगड ४७.६० %

टॅग्स :palgharपालघर