सूनिल घरत पारोळ : वसई तालुक्यातील पहिले भात खरेदी केंद्र अशी ओळख असणाऱ्या शिरवली केंद्र बंद पाडण्याचा घाट आदीवासी विकास सहकारी महामंडळाने घातला असून या वर्षी अवघी २२ क्विंटल भात खरेदी झाली आहे. या वर्षी भात पिकाची गुणवत्ता ठरवणाºया ग्रेडरने गुणवत्तेचा निकष लावला जात असल्याने भात पीकाचा दर्जा चांगला नसल्याचे कारण देत तो केंद्रावर स्विकारला जात नाही. मात्र नाकारलेला हा भात भिनार येथील भात खरेदी केंद्रावर घेण्यात आल्याने या वर्षी शिरवली केंद्राला फटका बसत आहे. भिनार येथील खरेदी केंद्र चालावे या साठी महामंडळ ही साथ देत असल्याचा आरोप शिरवली सेवा सोसायटीच्या पदाधिकारी यांनी केला आहे.वसईमध्ये भात खरेदी केंद्र नसल्यामुळे शासनाच्या १७७० रु पये प्रति क्विंटल भाव असताना व्यापारी अवघा एक हजार रुपये भाव देऊन शेतकºयांची लुट करीत आहेत.गत वर्षी या भात खरेदी केंद्राचे गोदाम भरल्याचे कारण देत महामंडळाने भिनार येथे भात खरेदी केली. या वर्षी तर आदीवासी विकास सहकारी मंडळाच्या अधिकाºयांनी भिनार येथे भात खरेदी केंद्र सुरु करु न गोदाम म्हणून थळयाचापाडा येथील तबेल्याचा वापर खरेदी केलेले भात उघड्यावर ठेवले. भिनार येथील भात खरेदी केंद्रात मोठ्या प्रामाणात भात पीक यावे यासाठी शिरवली भात खरेदी केंद्राला पारोळ, माजिवली, देपिवली आदी जवळ असलेली गाव भिनार भात खरेदी केंद्राशी जोडण्यात आली तर भात पीक कमी प्रमाणात घेण्यात येणारी गावे या केंद्रा पासून दूर असणारी गावे शिरवली भात खरेदी केंद्राशी जोडली आहेत.
शिरवलीतील भातखरेदी केंद्र बंद पाडण्याचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 01:49 IST