शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जुनी जव्हार ग्रा.पं.मध्ये घरकुल घोटाळा; पाच लाभार्थ्यांची नावे मंजूर, मात्र त्यांना प्रत्यक्षात घरकुले दिलीच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 03:23 IST

तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या चौकशीचे आदेश जारी झालेले असतांनाच जुनी जव्हार ग्रामपंचायत हद्दीतील कशीवली नं. २ येथील रहीवासी गोविंद भाऊ भुसारा व त्यांचे सोबत ४ लाभार्थी अशा एकूण पाच लाभार्थ्यांना घरकूल न देता त्याचे मंजूर झालेले पैसे परस्पर काढून घेतल्याची बाब उघडकीस आली असून, या लाभार्थ्यांनी पंचायत समिती व मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. पालघर यांना तक्रार केलेली आहे.

- हुसेन मेमनजव्हार : तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या चौकशीचे आदेश जारी झालेले असतांनाच जुनी जव्हार ग्रामपंचायत हद्दीतील कशीवली नं. २ येथील रहीवासी गोविंद भाऊ भुसारा व त्यांचे सोबत ४ लाभार्थी अशा एकूण पाच लाभार्थ्यांना घरकूल न देता त्याचे मंजूर झालेले पैसे परस्पर काढून घेतल्याची बाब उघडकीस आली असून, या लाभार्थ्यांनी पंचायत समिती व मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. पालघर यांना तक्रार केलेली आहे.सन २०१७-१८ मध्ये जुनी-जव्हार ग्रामपंचायत पैकी कशिवली नं. २ येथील सुशिला रविंद्र भोये, सुरेश मावंजी भोये, गोविंद भाऊ भुसारा, दशरथ रामा चौधरी व सुरेश रामा चौधरी या पाच लाभार्थ्यांना इंदिरा आवास व पंतप्रधान आवास योजनेतून गोविंद भाऊ भुसारा व दशरथ रामा चौधरी या दोघांना घरकूल योजनेचा लाभ देऊन घरकूल पूर्ण करून देण्यात आलेले असल्याची दप्तरी नोंद करण्यात आलेली आहे. मात्र या दोन्ही लाभार्थ्यांना प्रत्यक्षात घरकूल योजनेचा लाभच मिळालेला नसल्याची लेखी तक्रार करण्यात आली आहे.तसेच ग्रामपंचायतीत योजनेतून ज्या लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहेत ती संपूर्ण बोगस असून त्यांची पक्की घरे आहेत अशा लाभार्थ्यांना त्याच त्याच कुटुंबातील लाभार्थी शेतातील कुडा मातीच्या घरात राहत असल्याचे दाखवून लाभ दिलेला आहे. यामध्ये पंचायत समितीचे कर्मचारी व ग्रामसेवक, सरपंच यांच्या संगनमताने संपूर्ण कागदपत्रे बोगस दाखवून लाभार्थी निवड करण्यात आलेली आहेत. त्यामुळे जुनी-जव्हार ग्रामपंचायतीच्या घरकूल योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.याबाबत संबंधित कर्मचारी स्वप्नील इंगोळ यांना विचारणा केली असता, गोविंद भाऊ भुसारा यांच्या वडलांच्या नांवे घरकुल मंजूरकेलेले आहे, त्यामुळे एका कुटुंबातील दुसºया व्यक्तीला लाभ देता येत नाही, तरी याबाबत गट विकास अधिकाºयांकडून अधिक माहिती घ्या असे लोकमतच्या वार्ताहराला सांगण्यात आले.माझ्याकडे घरकूल योजनेच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, माझ्या कडे इतरही ग्रामपंचायतीच्या चौकशा असल्यामुळे अजून मी जुनी-जव्हार ग्रामपंचयतीची तपासणी केलेली नाही, लवकरच चौकशी करण्यात येईल.- मधुसूदन गवळी,इंदिरा आवास योजना विस्तार अधिकारी,पं. समिती जव्हार

टॅग्स :HomeघरVasai Virarवसई विरार