शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

आईची पायपीट थांबण्यासाठी विहीर खोदणाऱ्या प्रणवला घरकुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 05:41 IST

जिल्हा परिषदेमार्फत सत्कार; पोलिस अधिकाऱ्याने घेतली शिक्षणाची जबाबदारी

पालघर : डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठीची आईची पायपीट थांबविण्यासाठी सलग चार दिवस मेहनत करून विहीर खोदणारा केळवे येथील विद्यार्थी प्रणव सालकरची जिल्हा परिषदेने दखल घेतली आहे. स्थायी समिती सभेत त्याचा सत्कार करून त्याच्या कुटुंबाला घरकूल मंजूर करण्याचे आदेश अध्यक्ष प्रकाश निकम यांनी दिले आहेत. प्रणवची भेट घेण्यासाठी गुरुवारी त्याच्या घरी अनेक अधिकारी, सरपंच, ग्रामस्थ आले होते. सर्वजण त्याचे कौतुक करत होते. 

प्रणव सालकर हा पालघरच्या केळवे येथील धावंगेपाडा गावचा रहिवासी असून, सध्या नववी इयत्तेत शिकत आहे. आपल्या आईचे कष्ट वाचविण्यासाठी त्याने घराच्या समोरच अंगणात विहीर खोदली. पाण्यासाठी कुठल्या मुलाला अशी विहीर खणावी लागू नये, यासाठी २०२४ पर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी दिली. त्यांनी प्रणवला रोख ११ हजारांचे बक्षीस देऊन शबरी आवास योजनेमधून त्याच्या वडिलांना तत्काळ घरकूल मंजूर करून देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, उपाध्यक्ष पंकज कोरे, सर्व समिती सभापती, स्थायी समिती सदस्य, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विभागप्रमुख उपस्थित होते. 

शैक्षणिक साहित्य मिळाल्याने आनंद आईच्या वेदना पाहून दिवस-रात्र मेहनत घेत २० फुटांची विहीर खोदणाऱ्या प्रणवच्या कर्तबगारीची दखल केळवे सागरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी घेतली आहे. त्यांनी त्याच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी उचलली आहे. त्याला वह्या, पुस्तके, युनिफॉर्म, शूजसह शैक्षणिक साहित्य देण्यात आले. नवीन पुस्तके, शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्याचा आनंद त्याच्या निरागस चेहऱ्यावर दिसत होता.

आपल्या वेदनेची जाण ठेवून आपले श्रम वाचावेत, अशी त्याची इच्छा होती. यासाठी आपल्या एकुलत्या एक मुलाने घेतलेल्या परिश्रमाचे कुठलेही मोल होऊ शकत नाही. - दर्शना सालकर, प्रणवची आई