शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गॅस गळतीने घराला लागली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:48 IST

तालुक्यातील सफाळे येथील मिरानगर मधल्या फातिमा कॉम्प्लेक्समधील सुधाकर दराडे यांच्या फ्लॅटमध्ये गॅस गळती झाल्याने व शेगडीने पेट घेतला.

पालघर/सफाळे : तालुक्यातील सफाळे येथील मिरानगर मधल्या फातिमा कॉम्प्लेक्समधील सुधाकर दराडे यांच्या फ्लॅटमध्ये गॅस गळती झाल्याने व शेगडीने पेट घेतला. तात्काळ सफाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश उर्फ बंटी म्हात्रे आणि सहकाऱ्यांनी आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविल्याने पुढला अनर्थ टळला.दराडे हे आपली पत्नी आणि मुलासह कॉम्प्लेक्समध्ये राहतात. गुरुवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नी स्वयंपाक करीत असतांना शेगडीला जोडलेल्या रबरी नळीने अचानक पेट घेतला. त्या मुळे घाबरलेल्या त्या महिलेने घरातील सर्वाना माहिती देऊन इमारतीच्या खाली आल्या. माहिती वाºयासारखी सर्वत्र पसरल्यानंतर उपसरपंच म्हात्रे आपल्या सहकाºयांसह घटनास्थळी हजर झाले. ते येई पर्यंत सिलेंडर पेटून संपूर्ण स्वयंपाक घराला आगीने घेरले होते. सर्वत्र पसरलेल्या धुरामुळे पुढचे काही दिसत नसल्याने म्हात्रे यांनी फ्लॅटच्या खिडकीची काच फोडली. धुराचा लोट बाहेर पडल्या नंतर पेट घेतलेल्या सिलेंडर जवळच आणखी एक भरलेला सिलेंडर असल्याचे पाहिल्यावर म्हात्रे यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. त्यांनी आपले सहकारी सर्पमित्र प्रशांत मानकर, मिकेश शेट्टी, नागेश परेड यांच्या मदतीने घरातील ब्लँकेट पाण्याने भिजवून त्या द्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश मिळविले. पाच मिनिटांचा उशीर झाला असता तर दुसर्या सिलेंडर ने पेट घेतला असता व मोठी जीवितहानी झाली असती. या घटनेमुळे भयभीत होऊन शेजारच्या फ्लॅट मधील एक महिला स्वयंपाक सोडून घराबाहेर पळाली होती.