शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारमधील कचरा ठेकेदारी मोडीत निघणार! पालिका करणार कचरा व्यवस्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 00:22 IST

Vasai-Virar : वसई-विरार महापालिका क्षेत्रातून दररोज ६५० मेट्रिक टन कचरा दररोज निघतो. हा कचरा पालिकेच्या गोखिवरे-भोयदापाडा येथील क्षेपणभूमीवर जमा करण्यात येतो.

- प्रतीक ठाकूर

विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रातून निघणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन यापुढे महापालिका स्वतः करणार असून यासाठी महापालिकेने १० ट्रॉमिल, पाच पोकलेन (ब्रेकर), दोन लॉन्ग बूम, दोन शॉर्ट बूम, ५० ट्रिपर आणि १० कॉम्पॅक्टर अशी भली मोठी यंत्रसामग्रीची ऑर्डर केली आहे. यापैकी दोन ट्रॉमिल, एक पोकलेन (ब्रेकर) पालिका सेवेत दाखल झाला असून उर्वरित सामग्री मार्च महिन्यात दाखल होणार आहे. महापालिकेच्या या जय्यत तयारीमुळे पालिकेतील टक्केवारी आणि कचरा ठेकेदारी मोडीत निघेल, अशी शक्यता आहे.वसई-विरार महापालिका क्षेत्रातून दररोज ६५० मेट्रिक टन कचरा दररोज निघतो. हा कचरा पालिकेच्या गोखिवरे-भोयदापाडा येथील क्षेपणभूमीवर जमा करण्यात येतो. हा कचरा आतापर्यंत पालिकेच्या विविध ठेकेदारांकडून जमा करून तो क्षेपणभूमीवर जमा केला जात आहे. याकरिता महापालिकेने विभागवार २० ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. क्षेपणभूमीवर जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेकडे मात्र कोणतीही यंत्रणा नव्हती. दरम्यान, जानेवारी महिन्याच्या अखेरीस वसई-विरार महापालिकेच्या विकासकामांसंदर्भातील बैठकीत पालकमंत्री दादाजी भुसे यांनीही पालिका कचरा व्यवस्थापनाबाबतीत कोणती पावले उचलली आहेत, याची विचारणा अधिकाऱ्यांना केली होती. या वेळी पालिका करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली होती. त्यानुसार १० ट्रॉमील, पाच पोकलेन, ५० ट्रिपर, आणि दोन लॉंग बूम, दोन शॉर्ट बूमची ऑर्डर देण्यात आली आहे. यापैकी दोन ट्रॉमिल, एक पोकलेन (ब्रेकर) पालिकेच्या सेवेत दाखल झाला आहे. यातील १० ट्रॉमील क्षेपणभूमीवर बसवण्यात येणार आहे. यातील दोन मशीन सध्या पालिकेच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. तर पाच पोकलेनपैकी एक ब्रेकर आला असून या व्यतिरिक्त याचा वापर अनधिकृत बांधकाम निष्कासन कारवाईत होणार आहे. तर लाँग बूम मशीनचा वापर नाल्यातील गाळ काढण्यासाठी करण्यात येणार आहे.

महापालिकेला दंड महानगरपालिका क्षेत्रातून निघणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने हरित लवादाने वसई-विरार महापालिकेला ८० लाख रुपये, पालिकेजवळ स्वतःची क्षेपणभूमी नसल्यामुळे ८० लाख रुपये, तर या दोन्हीची अंमलबजावणी दिलेल्या मुदतीत न केल्यामुळे दर महिना २० लाख रुपयांचा दंड अलीकडेच ठोठावला होता.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार