शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारला उत्तम पर्यटन शहर म्हणून विकसित करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 21:53 IST

जव्हारचे गतवैभव परत मिळवून देऊत असे सांगताना एक उत्तम पर्यटन शहर म्हणून सर्व सोयी-सुविधा विकसित केल्या.

पालघर- जव्हारचे गतवैभव परत मिळवून देऊत असे सांगताना एक उत्तम पर्यटन शहर म्हणून सर्व सोयी-सुविधा विकसित केल्या जातील आणि त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. जव्हारच्या पाणीपुरवठ्यासाठी 17.36 कोटी, पर्यटनवृद्धीसाठी 10 कोटी आणि शहरातील विकासकामांसाठी 10 कोटी रुपये मंजूर करण्याची घोषणाही त्यांनी केली.जव्हार नगर परिषद स्थापन होऊन 1 सप्टेंबर रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त आयोजित पर्यटन  महोत्सवात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राजे महेंद्रसिंह मुकणे, खासदार राजेंद्र गावित, कपिल पाटील, आमदार अमित घोडा,  पास्कल धनारे, रवींद्र फाटक, जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे,  विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक गौरव सिंग आदींची उपस्थिती होती.जव्हार संस्थानचे श्रीमंत राजे मार्तण्डराव मुकणे यांनी लोककल्याणकारी पाऊल उचलत 1 सप्टेंबर 1918 रोजी जव्हार नगर परिषदेची स्थापना केली होती. त्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की, मुकणे राजघराण्याच्या नगर नियोजनाचा दृष्टिकोन होता. पण गेल्या 50 ते 60 वर्षांत या भागातील दीन दलित, आदिवासींपर्यंत विकास पोहोचलाच नाही. पश्चिम घाटातील हा सर्वांग सुंदर भाग निसर्ग सौंदर्यासाठी नव्हे तर कुपोषणासाठी ओळखल्या जाऊ लागला. जव्हार शहराची हद्दवाढ करण्याच्या प्रस्तावास निश्चितपणे मान्यता दिली जाईल, खडखड धरणासह या भागातील पाण्याचे  सर्व प्रश्न सोडविले जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. कुपोषणमुक्ती तसेच स्वच्छ भारतमध्ये पालघर चांगल्या पद्धतीने काम करीत असून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अभिनंदन करताना त्यांनी पालघर जिल्ह्याने प्रधानमंत्री आवास योजनेत उत्तम काम करून एकही कुटुंब बेघर राहणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले. जव्हार हा पर्यटनाच्या क गटात असला तरी तो ब गटात आणण्यासाठी विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात येईल, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस