शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

भयभीत ग्रामस्थ राहायला गेले झोपडीत! एका अफवेचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 01:38 IST

कोरोना रुग्ण आहेत अशी अफवा पसरली आणि आजूबाजूच्या गावपाड्यातील सर्व ग्रामस्थ भयभीत झाले. काही गावकरी गाव सोडून आपल्या शेतावरील झोपडीत राहायला गेले.

जव्हार - जव्हार तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या ओझर या गावी कोरोना रुग्ण आहेत अशी अफवा पसरली आणि आजूबाजूच्या गावपाड्यातील सर्व ग्रामस्थ भयभीत झाले. काही गावकरी गाव सोडून आपल्या शेतावरील झोपडीत राहायला गेले. अशा गावकऱ्यांमध्ये जाऊन काही शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून पथनाट्याद्वारे जनजागृती केली. पंचायत समिती शिक्षण विभाग तसेच समाजकार्यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सामाजिक अंतर ठेवून पथनाट्य सादर केले. यात कोरोनाची लक्षणे, आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे, शासन, पोलीस, डॉक्टर, सरकारी कर्मचारी कशा पद्धतीने कोरोनाशी लढा देत आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. या पथनाट्यामुळे काही ग्रामस्थांच्या मानातील भीती संपली व ते पुन्हा गावात राहण्यास तयार झाले. या वेळी गावातील आशाताई, अंगणवाडी ताई, सरपंच, ग्रामस्थ तसेच शिक्षकही उपस्थित होते. या पथनाट्यात नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ चर्चगेट येथे शिक्षण घेत असलेल्या सुषमा गवळी, विजया गवळी, रंजना वरखडे तसेच रत्नगिरी सबसेंटर कॉलेजचा विद्यार्थी कमलेश्वर पागी, यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ सोशल वर्क महाविद्यालयाचे अनिल खरपडे, अंकुश वरठा तसेच करिश्मा महाले सहभागी झाले होते.

टॅग्स :palgharपालघर