शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

ऍनीमल बर्थ कंन्ट्रोल सेंटरच्या नावावर फसवणूक, आरोपीला पुण्याच्या कोथरूड येथून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 19:44 IST

कारचा नंबर व कलरवरून आरोपीचा लागला सुगावा

नालासोपारा (मंगेश कराळे) :- ऍनीमल बर्थ कंन्ट्रोल सेंटरच्या नावावर नागरिकांना गुंतवणूक करण्यास सांगून लाखोंची फसवणूक करणाऱ्या आरोपीला बोळींज पोलिसांनी पुण्याच्या कोथरूड परिसरातून ताब्यात घेत अटक केल्याची माहिती बोळींज पोलिसांनी सोमवारी दिली आहे. विशेष म्हणजे आरोपीला त्याच्या मर्सडीज कारच्या नंबर व रंगावरून पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने नागरिकांना मेनका गांधींचा धाक दाखवून ही लाखोंची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

विरारच्या गोकुळ टाऊनशीप येथील ओम शिवम सोसायटीत राहणाऱ्या हरेन राठोड (३९) यांची १७ ऑक्टोबर २०२३ ते १४ एप्रिल २०२५ पर्यंत गुंतवणूकीच्या नावावर लाखोंची फसवणूक झाली होती. आरोपी हर्षवर्धन चौधरीने विरार, नाशिक व जळगाव येथे ऍनीमल बर्थ कंन्ट्रोल सेंटरमध्ये गुंतवणुक करण्याचे बहाण्याने त्यांच्याकडून ८ लाख १५ हजार रुपये व साक्षीदार सुनिता परमार यांचेकडुन ३ लाख ६८ हजार ५०० रुपये असे एकुण ११ लाख ८३ हजार ५०० रुपये घेतले होते. सदर ठिकाणी ऍनीमल बर्थ कंन्ट्रोल सेंटर न खोलता त्यांच्याकडून विश्वासाने घेतलेले पैसे परत न करता फसवणुक केली होती. तसेच आरोपीने त्यांना शिवीगाळी करुन खोटया गुन्हयात अडकवण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी बोळींज पोलिसांनी १४ एप्रिलला गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी बोळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीला अटक करण्याच्या सूचना तपास अधिकारी व सपोनि रुपेश दळवी व त्यांच्या टीमला दिल्या होत्या.

आरोपीच्या शोधात असताना पोलिसांना तो पुण्यात असल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी तपास अधिकारी रुपेश दळवी व त्यांची टीम पुण्याला रवाना झाली होती. आरोपीच्या मर्सडीज गाडीचा नंबर आणि रंग यावरून कोथरूड येथील चांदणी चौकातील एका इमारतीमधून हर्षवर्धन चौधरीला पकडले. आरोपीला शनिवारी वसई न्यायालयात हजर केल्यावर चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीला अटक केल्याची माहिती मिळाल्यावर फसवणूक झालेल्या ४ ते ५ नागरिकांनी वसई न्यायालयात येऊन बोळींज पोलिसांचे अभिनंदन केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मेनका गांधी यांच्या नावाने मुंबईसह आजूबाजूच्या राज्यात दहशत केली होती. आरोपी त्यांचे नाव वापरून पोलिसांवर दबाव आणायचा व पोलीस ठाण्यात प्राण्यांचे गुन्हे दाखल करायचा. मेनका गांधी माझ्या खास असून त्यांनीच ऍनीमल बर्थ कंन्ट्रोल खोलण्यासाठी सांगून लोकांची लाखो रुपयांची व प्राणी प्रेमींच्या भावनांशी खेळून फसवणूक केली आहे. आरोपीवर सध्या बोळींज, खार आणि पार्कसाईट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून फसवणूक झालेल्या नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन बोळींज पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :nalasopara-acनालासोपाराVasai Virarवसई विरार