शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वसईत दरड कोसळून चारजण ढिगाऱ्याखाली अडकले; दोन जणांना वाचविण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 12:11 IST

राजीवली परिसरात वाघराळपाडा परिसरात मोठ्या प्रमाणावर बैठ्या चाळींचे अनधिकृत बांधकाम करण्यात आलेले आहे.

मंगेश कराळे

नालासोपारा :- वसईच्या राजावली परिसरातील वाघराळपाडा येथे बुधवारी सकाळी दरड कोसळण्याची घटना घडली आहे.  या दुर्घटनेच्या ठिकाणाखाली चारजण गाडले गेली असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक पोलीस व वस‌ई विरार महानगरपालिका अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनांस्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे. दरम्यान दोन जणांना वाचवण्यात यश आले असून ढिगा-याखाली आणखीन दोन जण अडकल्याची तसेच ही चारही जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. मुसळधार पाऊस व परिसरातील अनधिकृत बांधकामामुळे जेसीबी घटनास्थळी असे पोहोचू शकत नसल्याने मदत कार्यात अडथळा येत असल्याची माहिती पालिका अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीवली गावातील वाघराळपाडा भागात बुधवारी दरड कोसळण्याचा प्रकार घडला आहे. या दरडीखाली एक घर दाबले गेलेले आहे व त्यात वडील व मुलगी अडकल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. अमित ठाकूर (३५) व रोशनी ठाकूर (१४) हे दोघे बाप-लेक यात ढिगा-याखाली अडकले असून वंदना अमित ठाकूर (३३) व ओम अमित ठाकूर (१०) या आई व मुलाला वाचवण्यात यश आले आहे. घटनास्थळी पोलीस दल व अग्निशामन दल यांचेकडून माती दगडी बाजूला करण्याचे काम चालू आहे.  राजीवली परिसरात वाघराळपाडा परिसरात मोठ्या प्रमाणावर बैठ्या चाळींचे अनधिकृत बांधकाम करण्यात आलेले आहे. दाटीवाटीने चाळी बांधण्यात आल्यामुळे घटनास्थळी मदत कार्य वेळेत पोहोचू शकले नाही. वनविभागाच्या जागेत असलेले डोंगर पोखरून येथे चाळमाफीयांनी अनधिकृत बांधकामे केली आसुन त्याला जबाबदार स्थानिक प्रशासन असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे