पालघर : येथील लोकमान्यनगरमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या चार तरुणांना पोलिसांनी अटक केली. गेल्या आठ महिन्यांपासून चाललेल्या या सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.नेपाळहून रोजगारासाठी आलेले दाम्पत्य येथे गेल्या दहा वर्षांपासून राहत असून पती आजारी असल्यामुळे त्याची पत्नी मोलकरणीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविते. त्यांची चौदा वर्षांची मुलगी पालघरमध्ये आठव्या इयत्तेत शिकते. या परिस्थितीचा फायदा घेत मोहपाडा येथील चार तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर, कुठेही वाच्यता करू नको म्हणून तिला धमकावून हे प्रकार सुरूच होते.तिच्या पोटात दुखू लागल्याने आईने डॉक्टरकडे तपासणी केली असता, ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर, तिच्या आईने पालघर पोलीस ठाणे गाठून चौघा नराधमांविरोधात तक्रार केली. गर्भवती मुलीच्या जबानीनंतर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी बाल अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत असल्याचे सांगितले. या बालिकेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (वार्ताहर)
सामूहिक अत्याचारप्रकरणी चौघे ताब्यात
By admin | Updated: August 16, 2015 23:16 IST