शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळांच्या चार इमारती पडूनच!

By admin | Updated: December 22, 2016 05:36 IST

जव्हार आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत बांधलेल्या चार आश्रमशाळांच्या नव्या इमारती विद्युत फिटिंग न झाल्याने गेली दोन वर्षे

हुसेन मेमन / जव्हारजव्हार आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत बांधलेल्या चार आश्रमशाळांच्या नव्या इमारती विद्युत फिटिंग न झाल्याने गेली दोन वर्षे पडून आहेत. एकीकडे सध्याच्या मोडकळीस आलेल्या आश्रमशाळा, विद्यार्थी नरकयातना सहन करीत शिक्षण घेत आहेत. तर दुसरीकडे प्रशासनाच्या मुर्दाडपणामुळे या इमारती धूळखात आहेत. आदिवासी विकासमंत्र्यांच्या जिल्ह्यातच हा विरोधाभास आहे. विशेष म्हणजे या जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत. तरीही त्यांना या भीषण वास्तवाचे कोणतेही सुखदु:ख नाही. या प्रकल्पांतर्गत विनवळ, साखरे, दाभेरी, देहरे या चार आश्रम शाळेतील वर्गखोल्या आणि निवास व्यवस्था यांची दुरवस्था झाल्याने या आश्रम शाळांना नवीन ईमारतीची अत्यंत गरज होती. या दृष्टीने शासनाने या शाळांच्या इमारतींना मंजुरी देऊन त्या १२ कोटी खर्च करून त्या तातडीने बांधल्या. मात्र दोन वर्ष होवूनही या आश्रम शाळेतील इमारती उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या विनवळ, साखरे, दाभेरी, देहरे या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच थंडीचे दिवस असल्याने मोडकळीस वर्गात थंडी वा-यात कुडकुडत बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. जव्हार आदिवासी विकास प्रकल्पातील या चार आश्रम शाळांचा सकाळी शाळा आणि संध्याकाळ व रात्री वसतीगृह असा दुहेरी वापर करावा लागत आहे. त्यातही ओल आलेल्या खोल्या, तुटके, गळके छप्पर, खिडक्या, दरवाजे बेपत्ता अशी अवस्था आहे. त्यामुळे पावसाळ्यात तर या आश्रम शाळेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची अत्यंत दयनीय अवस्था होत असते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था धड नाही. आंघोळीसाठी गरम पाणी करणारे सौरसंच बंदच. शौचालयांची व स्रानगृहांची दारे चोरीस, संरक्षक भिंत नाही, स्वयंपाकाची सामग्री साठविण्यास जागा नाही अशा अवस्थेत हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील विद्यार्थीनींची अवस्था अत्यंत भयावह आहे. आत्ताशी कुठे निघाले विद्युतीकरणाचे टेंडरइमारत तयार होवून दोन वर्षे झालीत. परंतु लाईटची फिटिंग झाली नसल्याने अजूनही इमारतींच्या उद्घटनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. आदिवासी आश्रम शाळेत निवासी राहून शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी नवीन इमारती तयार असूनही त्यांना मरणयातना सहन करीत जुनाट धोकादायक आश्रमशाळांत जिणे कंठावे लागत आहे. या बाबत जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशी केली असता, या आश्रम शाळांतील विद्युत फिटिंगचे टेंडर काढले आहे. या महिना भरातच विद्युत फिटिंग काम करण्यात येईल असे उत्तर बांधकाम विभाग जव्हार यांच्याकडून मिळाले आहे.