शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चार ब्रेथ अनालायझर मशिन्स; कोरोनात वापरण्यावर होती बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 00:22 IST

NalaSopara : गरज असेल तर या मशिन्स वापरण्यात येणार असून, ती नळी फेकून दरवेळी नवीन नळी वापरणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.

- मंगेश कराळे 

नालासोपारा : वसईच्या वाहतूक विभागाकडे ड्रंक अँड ड्राइव्हच्या केसेस करण्यासाठी चार ब्रेथ अनालायझर मशिन्स आहेत; पण कोरोनाकाळात या मशिन्स वापरण्यासाठी बंदी घालण्यात आल्याने त्या वसईच्या अंबाडी येथील वाहतूक विभागाच्या कार्यालयात ठेवण्यात आलेल्या आहेत. सध्या या मशिन्स वापरण्यासाठी सर्व्हिसिंगला पाठवल्या आहेत. गरज असेल तर या मशिन्स वापरण्यात येणार असून, ती नळी फेकून दरवेळी नवीन नळी वापरणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.कोरोनाच्या काळात ब्रेथ ॲनालायझर मशीनचा वापर ज्यावेळी अत्यंत गरज होती, तेव्हा करण्यात आला; पण त्याची योग्य ती काळजी घेण्यात आली. काही वेळेला प्रवाशांच्या वागण्यावरून त्याने दारू प्राशन केल्यासारखे व वास आल्यानंतरही केस करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनच्या आधी २ ते ३ महिन्यांत ड्रंक अँड ड्राइव्हच्या केसेस केल्या. ३१ डिसेंबरला  केसेस करण्यात आल्या असून, २०२१ मध्येही काही केसेस वाहतूक विभागाने केल्या आहेत.

कोरोनाकाळात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश असल्याने या मशिन्स वापरल्या नाहीत; पण काही गरजेचे असेल त्यावेळी वापरण्यात आल्या आहेत. ड्रंक अँड ड्राइव्हच्या केसेस केल्या आहेत. आता या मशिन्स वापरणार असून, जी नळी वापरली ती फेकून नवीन नळी प्रत्येक वेळी वापरणार. -विलास सुपे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग

कोरोनाकाळात दारूचा खप किती?कोरोनाकाळात दारूचा खप हा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. अंदाजित नेहमीपेक्षा ५० टक्के दारूचा खप कमी झाल्याने राज्य सरकारचे नुकसान झाले असल्याचे दारू उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार