शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

तुंगारेश्वर अभयारण्यातील वनसंपदा व पक्षी अधिवास धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 01:10 IST

वसई पूर्व येथे असलेले तुंगारेश्वर अभयारण्य हे ८ हजार ५७० हेक्टरचे आहे. २००३ मध्ये हे जंगल अभयारण्य म्हणून घोषित केले. मात्र आता ते धोक्यात आलेले आहे.

वसई : वसई पूर्व येथे असलेले तुंगारेश्वर अभयारण्य हे ८ हजार ५७० हेक्टरचे आहे. २००३ मध्ये हे जंगल अभयारण्य म्हणून घोषित केले. मात्र आता ते धोक्यात आलेले आहे. जंगलात शिकाऱ्यांचे प्रमाण वाढले असून पशू-पक्ष्यांच्या शिकारीसह दुर्मीळ सागाच्या झाडांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात येत आहे. जंगलात वारंवार आगी लावण्यात येत आहेत. ते रोखण्यात वनविभागाला मात्र अपयश येत आहे.तुंगारेश्वर अभयारण्यांत भूमाफियांनी अतिक्र मण करून जंगल गिळंकृत करण्यास सुरु वात केली आहे. याचा फटका अभयारण्यातील पशू-पक्षी आणि त्यांच्या अधिवाला बसतो आहे. अपुरी साधनसामग्री आणि तोकडे मनुष्यबळ यांमुळे तुंगारेश्वर अभयारण्याकडे लक्ष देण्यात अपयश येत असल्याचे वन विभागाचेच म्हणणे आहे.तुंगारेश्वर अभयारण्यात पूर्वी मोठयÞा संख्येने वन्य प्राणी व पक्षी अधिवास करत होते. मात्र आता याकडे प्रशासन आणि वनविभागाचे दुर्लक्ष झाल्याने जंगलपट्टा नष्ट होऊन वन्य प्राण्यांचे जीव धोक्यात आले आहेत.एकीकडे वाढते नागरीकरण व त्यातून उद्भवणारे अतिक्रमण यामुळे वनखात्याला आवश्यक असणारे वाढीव मनुष्यबळ न मिळाल्याने हा अनर्थ घडतो आहे.>विविध झाडे,पशू व पक्षांनी समृद्धया अभयारण्यात मुरुड शेख, हरडा, सागवन, सावर, पळस, शिसव, बांबू, चिंच, खैर, अर्जुन, जांभुळ, बकुळी, राजन, काकड, मोह अशा विविध प्रकारच्या वनस्पती तसेच बिबटयÞा, तरस, रानडुक्कर, रानमांजर, भेकर, कोल्हा, ससे, घोरपड, लांडगे असे विविध वन्य प्राणी तर पोपट, मोर, बगळा, घुबड, हळद्या, कोकिळा पावशा, सर्प गरुड, महाभृंगराज, शामा, जंगली पिंगळा, सुभग, पर्ण पक्षी असे २५० हून अधिक प्रजातीचे पक्षी आहेत. मात्र बेसुमार वृक्षतोड आणि शिकार यामुळे वनसंपदा आणि प्राणी-पक्ष्यांचा अधिवास नष्ट होत असल्याची चिंता पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली.अनेकदा जंगलात दारूभट्टी सुरू केली जाते, तर शेतीसाठी वृक्षतोड करण्यात येते. काही भूमाफियांनी जमीन गिळंकृत करण्यासाठी अतिक्रमण केले आहे, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.वृक्षतोड करून मातीभराव केला जातो आणि त्या ठिकाणी बेकायदा बांधकाम केले जाते. भूमाफिया आणि वृक्षतोड व शिकार करणाºयांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून त्यात बरेच तथ्य असल्याचे आढळून येते आहे.