शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
3
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
4
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
5
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
6
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
7
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

वनात लावल्या जातात आगी, स्थानिकांचा आरोप; वाडा तालुक्यात वाढते प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 02:27 IST

जंगलांना लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण जंगल होरपळून नव्याने लागवड केलेली वनसंपदा जळून खाक होते.

वसंत भोईर

वाडा : तालुक्याला २४ हजार हेक्टर क्षेत्र असलेले जंगल लाभलेले आहे. या जंगलाची राखण होण्यासाठी वाडा तालुक्यात वाडा पूर्व, वाडा पश्चिम व कंचाड असे तीन स्वतंत्र विभाग केलेले आहेत, तसेच वनविकास महामंडळ, वन्यजीव, अभयारण्य या विभागासाठी वर्ग-२च्या पाच अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून शंभरहून अधिक कर्मचारीवर्ग नेमण्यात आलेला आहे, तसेच रोजंदारीवर काम करणारे शेकडो मजूर या कर्मचाऱ्यांच्या दिमतीला आहेत. तरीही दरवर्षी पौष महिना संपला की, माघ महिन्यात येथील जंगलांना आगी लागण्याचे प्रकार सुरू होतात. या आगी लागत नाहीत, तर लावल्या जातात, असा आरोप केला जात आहे.

जंगलांना लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण जंगल होरपळून नव्याने लागवड केलेली वनसंपदा जळून खाक होते. येथील जंगलांना लागल्या जाणाऱ्या आगी या मानवनिर्मित असतानाही आजपर्यंत याबाबत एकही गुन्हा दाखल झालेला नाही. वाडा तालुक्याला लाभलेल्या वनसंपदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाऊलखुणा दर्शविणारा ऐतिहासिक कोहोज किल्ल्याचा समावेश आहे. २०० हेक्टरहून अधिक क्षेत्र असलेल्या या कोहोज किल्ला परिसरात लाखोंच्या संख्येने विविध प्रजातींमधील वनसंपत्ती आहे. मोठ्या प्रमाणावर वन औषधी झाडेही आहेत. मात्र, दरवर्षी येथील जंगलाला आग लागते व या आगीत हजारो नव्याने लागवड केलेली, तसेच वन औषधी वनसंपदा जळून खाक होते.येथील जंगलाची राखण करण्यासाठी वनविभागाने महाराष्ट्र वनविकास महामंडळ यांच्यावर जबाबदारी दिली आहे.वनविकास महामंडळाच्या वन अधिकाऱ्यांना या संदर्भात विचारणा केली असता, आग लागलेले क्षेत्र आमच्या अखत्यारित येत नाही, असे बोलून जबाबदारी टाळत असतात. दरम्यान, या आगी आटोक्यात आणण्यापूर्वीच या जंगलातील निम्म्याहून अधिक वनसंपदा होरपळून गेलेली असते. आग विझविण्यासाठी वन विभागाकडे अपुरे मनुष्यबळ, अपुऱ्या साधनसामुग्रीमुळे या आगी आटोक्यात येत नाहीत. आजवर आगी लावणाऱ्यांविरोधात वनविभागाने कारवाई केलेली दिसून येत नाही. 

टॅग्स :fireआग