शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाडा तालुक्यातील अनेक जंगलात वणवे, वन विभागाने लक्ष देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 04:26 IST

तालुक्यात मोठ्या प्रमाणात खाजगी मालकीचे आणि वन विभागाचे जंगल आहे. पावसाने जंगलात मोठ्या प्रमाणात गवत उगवते.जानेवारी-फेब्रुवारी मध्ये हे गवत पूर्णपणे सुकलेले असते. मात्र काही ठिकाणी समाज कंटकांमुळे तर काही ठिकाणी विजेच्या तारांमधून पडणा-या आगीच्या ठिणग्यांमुळे या जंगलातील मोठा भाग खाक झाला आहे.

वाडा : तालुक्यात मोठ्या प्रमाणात खाजगी मालकीचे आणि वन विभागाचे जंगल आहे. पावसाने जंगलात मोठ्या प्रमाणात गवत उगवते.जानेवारी-फेब्रुवारी मध्ये हे गवत पूर्णपणे सुकलेले असते. मात्र काही ठिकाणी समाज कंटकांमुळे तर काही ठिकाणी विजेच्या तारांमधून पडणा-या आगीच्या ठिणग्यांमुळे या जंगलातील मोठा भाग खाक झाला आहे. ह्यांमुळे जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर होतेच त्याच बरोबर अनेक वन्यजीव, प्राणी ह्या वणव्यांमधे मृत्यू पावतात. दुर्मिळ होत चाललेल्या पक्षी-प्राण्यांच्या प्रजातीही नष्ट होतात.ह्या वणव्यांमुळे पाळीव जनावरांच्या चरण्याचा प्रश्न देखील गंभीर बनतो. दर वर्षी लागणार्या ह्या आगींमुळे जंगलातील औषधी वनस्पती देखील नष्ट होत आहेत.शासनाच्या कोटींच्या कोटी वृक्ष लागवाडीच्या संकल्पाला आणि स्वप्नांना या वणव्यांमुळे तडा जात असून वनविभाग मात्र त्यावर उपाय करण्यास असमर्थ ठरलेला आहे.अनेक भागातील जंगलांमधे काही समाजकंटकांकडून ससे, रान डुकरे, मोर आणि अन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी जंगलाना आग लावली जाते.अशा समाजकंटकांचा वन विभागाने त्वरीत बंदोबस्त करण्याची गरज आहे. नाहीतर शासनाचा दर वर्षाचा कोटीच्या कोटी वृक्ष लागवडीवरील सगळा खर्च हा अशा वणव्यांमुळे वाया जाईल असे मत निसर्गप्रेमी व्यक्त करत आहेत.दर वर्षीच्या वणव्यांमुळे जंगलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दर वर्षी रानोमाळी-डोंगरांना मोठ्या प्रमाणात आगीने वेढलेले आपण बघतो. मात्र ह्यावर उपाय शोधण्यास वन विभागाला आजपर्यंत यश आलेले नाही.शासन वृक्षारोपणासाठी करोडो रु पये खर्च करते मात्र जंगलातील अशा वणव्यांमुळे जंगलांतील वन्यजीव आणि वनस्पती नष्ट होतात.ह्यावर वनविभागाने उपाय शोधण्याची गरज आहे.-विक्र ांत पाटील,निसर्ग प्रेमी

टॅग्स :fireआग