शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

लग्नामध्ये 11 मुलांना अन्नातून विषबाधा, पालघर तालुक्यातील किराट गावातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 06:39 IST

Food poisoning : पालघर तालुक्यातील किराट गावामध्ये एका लग्नसमारंभात अकरा जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे.

कासा - पालघर तालुक्यातील किराट गावामध्ये एका लग्नसमारंभात अकरा जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. संध्याकाळच्या वेळी लग्नसमारंभामध्ये ही लहान मुले थंड प्यायले आणि जेवल्यानंतर अचानक या लहान मुलांना उलटी व जुलाब सुरू झाले.या मुलांच्या पालकांनी लगेचच सोमटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांना उपचारांसाठी दाखल केले. पण तेथे काही फरक पडत नसल्याने त्यानंतर सोमटा आरोग्य केंद्रातून मुलांना दुपारी एक वाजता कासा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये वय वर्षे पाच ते दहा वयोगटातील मुलांची संख्या आहे. त्यामध्ये अनुष्का माळी, अंजली माळी, आयुष माळी, साहिल माळी, सलोनी माळी, सुशील माळी, प्रणिती माळी, मयांक माळी, प्राची माळी, सुनील माळी, निखिल माळी अशी या मुलांची नावे आहेत. सध्या या मुलांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कासा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.दरम्यान, पालघर जिल्ह्यामध्ये कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीमुळे लग्नसमारंभांसह सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने आली होती. परंतु आता जिल्ह्याचा कोरोनामुक्तीकडे प्रवास सुरू असताना आणि लाॅकडाऊनही शिथिल झालेले असल्यामुळे जिल्ह्यात गेले दहा महिने रखडलेले लग्नसमारंभ होऊ लागले आहेत. अशाच एका लग्न समारंभात हा प्रकार घडल्याने खळबळ माजली  आहे. कोरोनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन   जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने ग्रामीण भागात चिंता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी कोरोनासंदर्भातील नियमांचेही उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे.  दरम्यान, विषबाधा झालेल्या काही मुलांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले असून त्यांना घरी सोडण्यात आल्याचे समजते. 

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाpalgharपालघर