शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

वसई मिठागरातील लोकवस्तीवर यंदाही पुराचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 04:36 IST

स्थलांतरास नागरिकांचा विरोध; प्रशासनाची कोरोनामुळे कसरत

पारोळ : यंदा वसई-विरार पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. त्यामुळे वसई पूर्वेतील मिठागर मजुरांच्या वस्तीला पुराचा धोका निर्माण होणार आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास शेकडो नागरिकांना कोरोनासारख्या आपत्तीत विस्थापित करण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती विभागाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. जुलैमध्ये कोरोनाचा धोका वाढण्याची डॉक्टरांनी शक्यता व्यक्त केली आहे. कोरोना आणि पूर अशा दोन्ही आपत्तींत महापालिका प्रशासन, अग्निशमन विभाग आणि आपत्ती विभागातील कर्मचाऱ्यांना आपले काम निभवावे लागणार आहे.वसई पूर्वेतील नवघर येथील मिठागर असलेल्या ठिकाणी सर्वसामान्य मजुरांची मोठी वस्ती आहे. दरवर्षी पुराचा पहिला फटका या वसाहतीला बसतो. त्यामुळे सुमारे ५०० च्या आसपास मजुरांना दरवर्षी अग्निशमन विभागाच्या सहकार्याने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे लागते. यंदा पुरामुळे नागरिकांना स्थलांतरित करण्यात कोणतीच अडचण नसली तरी समोर कोरोनाचा धोका आहे. एका मजुराला जरी या विषाणूची लागण झाली आणि त्यात पुरामुळे त्यांच्यावर स्थलांतराची वेळ आली तर सर्वात मोठे संकट कोसळण्याची भीती आहे. मदतकार्य करणाºया जवानांनाही संसर्गाचा धोका पोहोचू शकतो. महापालिका प्रशासनाने मे महिन्यातच नालेसफाईसारखे काम मन लावून केले असते, तसेच नैसर्गिक नाल्यांवर झालेली अनधिकृत बांधकामेतत्काळ निष्कसित केली असती तर ऐन पावसाळ्यात नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगण्याची गरज पडली नसती.दरवर्षी पावसात साचते पाणी मागील २० वर्षांपासून अमीर महल मिठागराच्या ठिकाणी ४५० ते ५०० लोकवस्ती आहे. या ठिकाणी दरवर्षी पाणी साचते. दरवर्षी पाणी साचल्यानंतरही येथील नागरिकांचे स्थलांतर करण्यास विरोध असतो. त्यामुळे दरवर्षी पालिका प्रशासनाचीच डोकेदुखी वाढते. नुकतेच झालेल्या निसर्ग चक्रीवादळातही प्रशासनाने बसची व्यवस्था या ठिकाणी केली होती. मात्र तेव्हाही नागरिकांनी स्थलांतर करण्यास विरोध दर्शवला.