शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षे बेपत्ता व्यक्तीला कुटुंबीयांच्या केले स्वाधीन, पोलिसांच्या ‘विश्वास जनजागृती’ मोहिमेला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 03:34 IST

गावात कोणी अनोळखी व्यक्ती आढळल्यास त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करा, अशी पालघर पोलिसांनी ‘विश्वास जनजागृती मोहीम’ सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी डहाणू तालुक्यातील निंबापूर येथे एका वेडसर इसमाला स्थानिकांनी सुखरूप पोलिसांच्या स्वाधीन केले.

- शशिकांत ठाकूरकासा : गावात कोणी अनोळखी व्यक्ती आढळल्यास त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करा, अशी पालघर पोलिसांनी ‘विश्वास जनजागृती मोहीम’ सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी डहाणू तालुक्यातील निंबापूर येथे एका वेडसर इसमाला स्थानिकांनी सुखरूप पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर, पोलिसांनी मूळच्या जालना येथील इसमाला त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांच्या या यशस्वी शोधमोहिमेमुळे एका पाच वर्षे बेपत्ता इसमाला आपले घर मिळाले आहे.मूळचे जालना येथील असलेले राणोजी जाधव हे मागील साडेचार ते पाच वर्षांपासून बेपत्ता होते. कुटुंबीयांकडून त्यांची शोधाशोध सुरू होती, मात्र शोध लागत नसल्याने राणोजी यांचे कुटुंबीय हतबल झाले होते. बुधवारी दुपारच्या सुमारास कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाच्या ९-१० किमी अंतरावर निंबापूर या गावात एक इसम फिरत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी या इसमाला कासा पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर कासा पोलिसांनी विचारपूस करून तो मूळचा जालना जिल्ह्यातील कोटी या गावातील असल्याचे समोर आल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याला माहिती दिली. कासा पोलिसांनी गुगलमार्फत त्याच्या गावातील एका रजिस्टर दुकानदाराचा मोबाइल नंबर मिळवून त्या व्यक्तीची ओळख पटल्यानंतर दुकानदारामार्फत त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क केला. राणोजी यांना गुरुवारी कासा येथे पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. त्यामुळे कासा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे राणोजी त्यांच्या कुटुंबीयांकडून विशेष आभार मानण्यात आले.दरम्यान, वर्षभरापूर्वी कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गडचिंचले येथे चोर समजून रात्रीच्या वेळी जमावाने दोन साधू आणि त्यांचा चालक यांची हत्या केली होती. मात्र, सदर मोहिमेमुळे आता लोकांना जाणीव झाली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारPoliceपोलिस