शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरच्या उत्तन समुद्रात बुडालेली बोट अखेर किनाऱ्यावर आणण्यात मच्छिमारांना यश, खलाशी सुखरुप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 17:22 IST

वादळीवारा व मुसळधार पावसामुळे खवळलेल्या समुद्रात भाईंदरच्या उत्तन नवीखाडी येथील ब्लेसिंग ही मच्छीमार बोट मंगळवारी रात्री बुडाली. बोटीवरील नाखवा व खलाशी अशी 10 जणं पोहून नजिकच्या बोटींवर पोहोचल्याने बचावले.

धीरज परब / मीरारोड - वादळीवारा व मुसळधार पावसामुळे खवळलेल्या समुद्रात भाईंदरच्या उत्तन नवीखाडी येथील ब्लेसिंग ही मच्छिमार बोट मंगळवारी रात्री बुडाली. बोटीवरील नाखवा व खलाशी अशी 10 जणं पोहून नजिकच्या बोटींवर पोहोचल्याने बचावले.  बोट किनाऱ्यापासून जवळ बुडाल्याने जीवितहानी टळली. बुडालेली बोट स्थानिक मच्छिमारांनी दोन बोटींच्या सहाय्याने ओढत चौक धक्क्याजवळ आणली.  

उत्तनच्या नवीखाडी येथील डिक्सन डिमेकर यांची ब्लेसिंग ही मच्छिमार बोट सोमवारी ( 18  सप्टेंबर )मासेमारी साठी समुद्रात गेली होती. डिक्सनसह भाऊ निलेश आणि 8 खलाशी बोटीवर होते. परंतु काल मंगळवारी( 19 सप्टेंबर ) हवामान खात्यापाठोपाठ मत्स्यव्यवसाय विभागाने समुद्रात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देत मच्छिमारांना पुढील 24 तास समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला. त्यामुळे समुद्रात मासेमारी साठी गेलेल्या बोटी माघारी परतू लागल्या. 

काल मंगळवारी डिमेकर यांची ब्लेसिंग बोटदेखील परतीच्या वाटेला लागली.  रात्री चौक धक्क्याला येत असताना किनाऱ्यापासून अर्धा किमी अंतरावर खवळलेल्या समुद्रात वाळूच्या बेटाला लागून बोट उलटली. बोट बुडताच बोटीवरील नाखवा व खलाशांनी खवळलेल्या समुद्रात उड्या घेतल्या. नजीकच्या बॅबिलोन व मुक्तीदाता या वसईच्या मच्छीमार बोटींना गाठत स्वतः चा जीव वाचवला. 

आज बुधवारी सकाळी उत्तन, चौक, पाली भागातील मच्छीमारांनी चौक धक्क्याकडे धाव घेतली. बोटीवरील नाखवा व खलाशी सुखरूप असल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.  बुडालेल्या बोटीचा शोध मच्छिमारांनी लावला असून ती समुद्रात वाळूत उपडी होऊन  रुतून बसली होती. पाऊस, वादळीवारे आणि समुद्र खवळलेला असूनही मच्छीमारांनी मोठ्या हिमतीने बुडालेली बोट काढण्याचे प्रयत्न सुरु केले . दोन बोटींच्या सहाय्याने दोरखंडाने बांधून बुडालेली बोट चौक धक्क्याजवळ आणण्यात मच्छिमारांना यश आले . 

'लोकमत'ने सकाळीच बोट बुडाल्याची बातमी दिल्यानंतर संबंधित सरकारी यंत्रणांनी घटनेची माहिती घेतली . पोलीस उपअधीक्षक नरसिंह भोसले , नायब तहसीलदार पंढरीनाथ भोईर, सहाय्यक निरीक्षक प्रवीण साळुंके, मच्छीमार नेते बर्नड डिमेलो, मॅल्कम  कासुघर आदी उपस्थित होते . 

हवामान खात्यासह मत्स्य व्यवसाय विभागाने मंगळवारीच वादळीवारा व मुसळधार पावसाची माहिती देत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला.  पण जे आधीच समुद्रात गेले होते त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची ? असा सवाल मच्छीमार नेते बर्नड डिमेलो यांनी केलाय. 

आधीच कल्पना असती तर मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात गेले नसते. डिमेकर यांच्या बोटीला अपघात होऊन असा जीवघेणा प्रसंग टळला असता. डिमेकर सह अन्य मासेमारी बोटींना परत फिरावे लागले. त्यामळे डिमेकर सह अन्य मच्छीमार यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी डिमेलो यांनी केली आहे.