शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

साडेतीन एकराच्या तळ्यात मत्स्यशेती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 00:55 IST

साडेतीन एकरमधील पडिक जमिनीत निर्माण केलेल्या शेततळ्यात छंद म्हणून मत्स्यशेती करून शहरी तरुणांना शेतीकडे वळण्यासाठी साद घातली आहे.

विरार : इच्छा आणि आवड असली की कोणतीही अविश्वसनीय गोष्ट शक्य करता येते. विरार-मनवेलपाडा येथील विनोद पाटील यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. विनोद पाटील यांनी त्यांच्याकडे असलेल्या साडेतीन एकरमधील पडिक जमिनीत निर्माण केलेल्या शेततळ्यात छंद म्हणून मत्स्यशेती करून शहरी तरुणांना शेतीकडे वळण्यासाठी साद घातली आहे.विनोद पाटील मूळचे विरार-मनवेल पाडा येथील असून दहा एक वर्षांपूर्वी येथे मोठ्या प्रमाणात शेती होत होती. मात्र, पुढे शहरीकरणाच्या रेट्यात शेतीच्या जागी इमारती उभ्या राहिल्या. या बदल्यातही काही व्यक्तींनी आजही आपला पारंपरिक शेती व्यवसाय प्राणपणाने जपण्याचा प्रयत्न केला आहे.विनोद पाटील यांचे वडील मुंबई महापालिकेत नोकरीला आहेत. पण नोकरी आणि शेती अशा दोन्ही पातळीवर तेव्हा ते कसरत करत होते. त्यातही त्यांचा ओढा शेतीकडे होता. शेतीतील नावीन्य जाणून ते ही आवड जपत आहेत. त्यासाठी वेळ मिळेल तेव्हा ते यूट्यूबवरून शेतीविषयक माहिती मिळवत होते. त्यांनी आपली शेतीची आवड जपण्यासाठी विरार पूर्व डी-मार्ट परिसरात असलेल्या पडिक जमिनीत बनवलेल्या तळ्यात प्रायोगिक तत्त्वावर मत्स्यशेती करण्याचा निर्णय घेतला. रेल्वेलाइनलगत असलेले हे तळे साडेतीन एकर जागेत आहे. खाऱ्या आणि गोड्या अशा संमिश्र पाण्याचे हे तळे आहे. या तळ्यात पाटील यांनी जिताडा आणि तिलिफया या दोन जातींच्या माशांचे तीन महिन्यांपूर्वी बीज सोडले होते. या तळ्यातून सध्या त्यांना आठवड्याला दहा किलोपर्यंत मासळी मिळते.>शेतीला व्यावसायिक जोड हवी!शहरातील नोकरीला मर्यादा आल्या आहेत. कोरोनामुळे हे संकट अधिक गडद झाले आहे. त्यामुळे तरुणांची पावले गावाकडे वळतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. तेव्हा त्यांनी शेतीतील अत्याधुनिक प्रयोगांतून आपले अस्तित्व दाखवून द्यायला हवे. आता आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती कशी करू शकतो यासाठी प्रयत्न करायला हवेत, असा सल्ला मत्स्यपालक विनोद पाटील यांनी दिला.