शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना विषाणूच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक लक्ष्य, पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:20 IST

coronavirus news : नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात कोरोनाने झालेले मृत्यू ० ते २० वयोगटातील एक तरुण आणि एक तरुणी असे दोन मृत्यू झाले असून २० ते ३० वयोगटातील १० रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात सहा तरुण आणि चार तरुणींचा समावेश आहे. 

- हितेन नाईक

पालघर : मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाने ग्रामीण भागातील एकूण ३०१ मृत्यूंपैकी सर्वाधिक १४९ मृत्यू पालघर तालुक्यात झाले असून त्यातील १३० मृत्यू हे ६१ वर्षे वयोगटापुढील व्यक्तींचे आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत कोरोना व्हायरसच्या संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविल्याने ६१ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक कुटुंबीयांनी आता जपावे लागणार आहे.नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात कोरोनाने झालेले मृत्यू ० ते २० वयोगटातील एक तरुण आणि एक तरुणी असे दोन मृत्यू झाले असून २० ते ३० वयोगटातील १० रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात सहा तरुण आणि चार तरुणींचा समावेश आहे. ३१ ते ४० वयोगटापैकी ३२ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात २२ पुरुष, तर १० स्त्रियांचा समावेश आहे. ४१ ते ५० वयोगटातील ३८ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील ३२ पुरुष, तर सहा महिलांचा समावेश आहे. 

जिल्ह्यात कोरोनाने झालेले मृत्यू 

५१ ते ६० वयोगटातील ८९ ज्येष्ठांचा मृत्यू झाला असून त्यात ६७ पुरुष व २२ महिलांचा समावेश आहे. तर, ६१ वर्षांवरील वयोगटात सर्वाधिक १३० मृत्यू झाले असून ८६ पुरुष, तर ४४ महिलांचा समावेश आहे. मृत्यूच्या नोंदीत २१५ पुरुष, तर ८६ महिलांचा समावेश असून एकूण ३०१ रुग्णांचे मृत्यू पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा व वसई (ग्रामीण) मधील आहेत.  

१०० सप्टेंबरमध्ये मृत्युमुखीपालघर जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीमुळे सर्वाधिक मृत्यूच्या घटना या सप्टेंबर महिन्यामध्ये (१०० मृत्यू) घडल्या आहेत. कोरोना प्रादुभावाच्या सुरुवातीच्या काळात म्हणजेच मार्चमध्ये १ मृत्यू, एप्रिलमध्ये २, मे महिन्यात १ मृत्यू, जूनमध्ये १४, जुलैमध्ये ३३, ऑगस्टमध्ये ९६, सप्टेंबर १००, तर ऑक्टोबरमध्ये ३९ रुग्णांचे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस