शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्वच्छतेत वाणगांव ग्रामपंचायतील प्रथम पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 22:54 IST

मांडे व हमरापूर अनुक्रमे द्वितीय, तृतीय : स्वच्छता, पाणी, तंटामुक्ती अन् सलोख्याचे निकष

पालघर : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०१७-१८ अंतर्गत जिल्हास्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा व विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना स्वातंत्र्य दिन समारंभात पालक मंत्री विष्णू सवरा यांचे हस्ते गौरविण्यात आले.यावेळी प्रथम क्र मांक ग्रामपंचायत वाणगाव, ता. डहाणू यांना ५ लाखाचे पारितोषिक, दिव्तीय ग्रामपंचायत मांडे ता. पालघर ३ लाख आणि तृतीय ग्रामपंचायत हमरापूर ता. वाडा यांना २ लाखाचे धनादेश, प्रशस्तीपत्रक देऊन पालक मंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच विशेष पुरस्कारांतर्गत कुटुंब कल्याण- स्व आबासाहेब खेडकर पुरस्कार विजेते ग्रामपंचायत खानिवडे ता. वसई यांना २५ हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. पिण्याचे पाणी व सांडपाणी व्यवस्थापन या करीता स्व. वसंतराव नाईक पुरस्कार विजयती ग्रामपंचायत शिरोषी ता. जव्हार यांना २५ हजाराचा धनादेश प्रदान करण्यात आला. तसेंच तलासरीतील झाई-बोरीगाव ग्रामपंचायतींना २५ हजार धनादेश प्रदान करून सामाजिक एकता डॉ. बाबसाहेब आंबेडकर पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी जि. प. अध्यक्ष विजय खरपडे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, पोलीस अधीक्षक गौरव सिंग, उपाध्यक्ष निलेश गंधे, सभापती अशोक वडे आदि मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार